loader image
[ays_poll id=7]

वन्यप्राण्यांचे मृत्यू होत आहेत की होत आहे शिकार ?

Dec 25, 2023


नांदगाव : मारुती जगधने सध्या तालुक्यात काळवीट हरीण,लांडगे, कोल्हे,रानडुकरे यांचे प्रमाण वाढले असून त्यात हरीण व काळवीट यांचे मृत्यूचे प्रमाण वाढले असून
काळवीट आणी हरीण या वन्यप्राण्यांची मोकाट कूत्रे,लांडगे,बिबट्या या प्राण्याकडुन शिकार होणे किंवा चारा व पाण्याच्या शोधात असलेल्या वन्यप्राण्याची मोकाट कुञ्यांकडुन शिकार होत असल्याचे चित्र नांदगाव तालुक्यात निर्माण झाले आहे तसेच मृत हरीण, काळवीट यांच्या अवयवांची तस्करी होऊ नहे म्हणून नांदगाव वनविभागाने वनकार्यालयाच्या मोकळ्या जागेत या मृत वन्य हरणांना किंवा काळविटांना या ठिकाणी दहन केले जात असल्याने येथे वन्य प्राणी स्माशानाचे स्वरूप आले आहे .
दरम्यान चांदोरा जंगलात एका मोठ्या काळविटाची जंगल परिसरात शिकार झाल्याने काळविटाच्या मागचे धड अर्धे तोडून लचके तोडले असल्याने ते जागीच मृत झाले या हरणाची चांदोरा जंगलात झालेली शिकार ,बिबट्या,लांडगे किंवा मोकाट कुञे या पैकी कोणी तरी केली असावी असा अंदाज वर्तविला गेला या अगोदर दुसरे एका मृत हरीणाचा कार्यालयाच्या बाजूला दहन करण्यात आले होते.ती आग विझत असताना चांदोरा शिवारातील दुसरे हरीण देखील त्या ठिकाणी दहन करण्यात आले सध्या हरणांच्या मृत्यूचा सिलसिला चालूच आहे. गत दोन महिण्यात जळगांव,बु नांदगांव,चांदोरा, व अन्य ठिकाणी सुमारे १० हरणांची शिकार झाली आहे या घटने संदर्भात वन विभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी ढोले यांनी हरणांच्या अवयवांची तस्करी होऊ नये म्हणून मृत झालेल्या वन्यप्राण्याचे दहन करण्याची पध्दत सुरु केल्याने त्यांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे .


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.