loader image

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र आयोजित नमो चषक 2024 राज्यस्तरीय भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत नांदगाव तालुकास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा.

Dec 26, 2023


 

मनमाड:- भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक आयोजित नमो चषक 2024 टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन दि.12 जानेवारी 2024 पासून महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल, मनमाड येथे सुरु करण्यात येणार आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची फि आकारली जाणार नाही.http://namochashak.in/या लिंकवर जाऊन आपल्या संघातील खेळाडूंची नोंदणी करावी.तालुक्यातील सर्व क्रिकेट संघाना मोफत प्रवेश दिला जाणार असून विजेत्या संघाना आकर्षक पारितोषीके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.नांदगाव तालुका मतदार संघातील जास्तीत जास्त क्रिकेट संघांनी नमो चषक क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन शंकरराव वाघ जिल्हाध्यक्ष नाशिक ग्रामीण उत्तर, सुनील पवार भाजपा युवा मोर्चा नाशिक जिल्हाध्यक्ष ग्रामीण उत्तर, नारायण पवार भाजपा नाशिक जिल्हा चिटणीस ग्रामीण यांनी केले आहे.तसेच आपल्या अधिक माहितीसाठी व नोंदणी फॉर्म साठी शुभम गायकवाड नांदगाव नमो चषक संयोजक युवा मोर्चा नांदगाव तालुका, सचिन भाऊ संघवी , मनमाड मंडल अध्यक्ष भाजपा,सचिन कांबळे भाजपा,मनोज ठोंबरे सर अध्यक्ष मनमाड क्रिकेट असोसिएशन, देवेंद्र चुनियान उपाध्यक्ष मनमाड क्रिकेट असोसिएशन,जाविद शेख सर सचिव मनमाड क्रिकेट असोसीएशन,सनी अरोरा सर खजिनदार मनमाड क्रिकेट असोसिएशन,परेश राऊत सदस्य मनमाड क्रिकेट असोसिएशन यांच्याशी संपर्क साधावे.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.