नांदगाव – (मारुती जगधने) नांदगाव येथे विविध मागण्यासाठी ढोलबजाव आंदोलन करीत कळमदरी गावचा धडक मोर्चा व साखळी उपोषण नांदगाव तहसिल येथे प्रारंभ करण्यात आला .
नांदगाव,जामदरी ते कळमदरी आणी कळमदरी ते गिरणाडँम रस्त्याची दुरूस्ती करुन मिळावी तसेच आदीवासींना शबरी व प्रधानमंञी आवास योजनेपासुन वंचित असलेल्यांना लाभ मिळावा या
करिता जातीच्या दाखल्यासाठी नोंदी उपलब्ध करुन
सहकार्य करावे या मागणी साठी तहसीलदार कार्यालयावर धडकमोर्चा काढून उपोषन करण्यात आले. या दरम्यान आंदोलकांनी टाळ मुर्दुंगाच्या गजरात ढोल बजाव आंदोलन करण्यात आले या वेळी नांदगाव हुतात्मा चौक ते तहसीलदार कार्यालया पर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला यात शेकडो नागरीक सामील झाले होते.
वंचित आदीवासींना शासकिय योजनांचा लाभ मिळणेकामी जातीच्या दाखल्यांचा कॅम्प घेऊन दाखले वाटप करावे, लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले असून यात विविध मागण्यांचे निवेदन नांदगाव तहसीलदार, पोलीसस्टेशन, पंचायत समिती आदींना देण्यात आले आहे .तसेच या मागण्यामध्ये कळमदरी येथील शासकिय दवाखाण्यातील वैद्यकिय अधिकारी मुख्यालयात राहत नाही त्यामुळे राञी वेळप्रसंगी रुग्नांना, व महिलांना डिलीवरी साठी गैरसोयीचे होत असून रात्री प्रकृती बिघडलेल्या रुग्णांना सेवा मिळत नाही, लाभार्थींना बैलगोठा,घरकुल योजना यांचा लाभ मिळावा, जवाहर रोजगार विहीर योजना लाभ मिळावा, एल टी लाईट विजेचे खांब नविन टाकावे,व वीज सुरळीत करावी,वाडे,वस्ती, मळे, तळे आदी ठिकाणी वीज मिळावी,या बरोबर काळदरीवासीयांना नियमित थ्रीफेज वीज पुरवठा अखंडीत मिळावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या असून यासाठी नागरीकानी उपोषन सुरु केले आहे .उपोषनात महीला व पुरुष सामील झाले आहे कळमदरी येथील नागरीकानी हे आंदोलन पुकारले आहे .