महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आयोजित विद्यार्थी पालक मेळाव्यात आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष निकम यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना अपयश ही यशाची पहिली पायरी आहे तसेच पालकांनी आपल्या पाल्याची संवाद साधने गरजेचे आहे व मुलांना चांगले संस्कार देणे गरजेचे आहे असे आवाहन केले. कार्यक्रमाची प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. जे.वाय. इंगळे यांनी केले त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन करण्याचा उद्देश विद्यार्थ्यांना व पालकांना स्पष्ट करून सांगितला तसेच विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करण्याचे काम महाविद्यालयाचे आहे म्हणून विद्यार्थी पालक मेळावा हा फक्त विद्यार्थी व पालक मेळावा नसून विद्यार्थी पालक व शिक्षक मेळावा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी मनमाड परिसरातील पालक उपस्थित होते त्यांनी देखील महाविद्यालया विषयी आपापली मते व्यक्त केली व महाविद्यालयातील विद्यार्थी तेजल पानसरे, रोशन देवरे, निकिता आहेर, शीतल वाजे, यांनी देखील महाविद्यालयाविषयी आपापली मते व्यक्त केली या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर बी एस देसले, कार्यालयीन कुलसचिव समाधान केदारे. डॉ जे वाय इंगळे सर्व प्राध्यापक विभाग प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ गणेश गांगुर्डे यांनी केले तर आभार डॉक्टर बी एस देसले यांनी मानले.

राशी भविष्य : १६ सप्टेंबर २०२५ – मंगळवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...