loader image

सरपंच, उपसरपंच ए सी बी च्या जाळ्यात – तीस हजारांची लाच मागितली

Dec 30, 2023





चांदवड तालुक्यातील सोग्रस येथील सरपंच, उपसरपंच यांना तीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

सरपंच भास्कर पुंडलिक गांगुर्डे (५५) आणि उपसरपंच प्रकाश चंद्रभान गांगुर्डे (४५) अशी त्यांची नावे आहेत. तक्रारदाराच्या मित्राने जिल्हा परिषदेअंतर्गत सोग्रस येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होते. मात्र, या बांधकामाचे बिल अद्याप मिळाले नव्हते. हे बिल काढण्यासाठी तक्रारदार यांना अधिकारपत्र प्राप्त होते. पाण्याच्या टाकीचे बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हस्तांतरण पत्रावर सरपंच व उपसरपंच यांनी सही करून पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५० हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३० हजारांची लाचेची रक्कम घेण्याचे मान्य करून ती घेतली असता, त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर अधीक्षक माधव, रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक

अनिल बडगुजर, दीपक पवार, संजय ठाकरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

*==* *प्रेसनोट* *==*
*यशस्वी सापळा कारवाई*
▶️ *युनिट -* *नाशिक*
▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-20
▶️ *ईलोसे-*
1) भास्कर पुंडलिक गांगुर्डे वय 55 वर्ष धंदा शेती व सरपंच, सोग्रस, रा. सोग्रस, तालुका-चांदवड, जिल्हा नाशिक.
2) प्रकाश चंद्रभान गांगुर्डे वय 45 वर्ष,धंदा शेती व उपसरपंच- सोग्रस,रा. सोग्रस, तालुका-चांदवड, जिल्हा- नाशिक.
▶️ *लाचेची मागणी-*
50,000/- रुपये तडजोडी अंती 30,000/- रूपये स्वीकारण्याचे मान्य केले.
▶️ *लाच स्विकारली-*
30,000/ रुपये
▶️ *हस्तगत रक्कम-*
30,000/-रुपये
▶️ * *लाचेचे कारण**
यातील तक्रारदार यांच्या मित्राने जिल्हा परिषद अंतर्गत मौजे सोग्रस येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होते. मात्र सदर बांधकामाचे बिल अद्याप अप्राप्त होते. सदर बिल काढण्यासाठी तक्रारदार यांना अधिकारपत्र प्राप्त होते. सदर पाण्याच्या टाकीचे बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हस्तांतरण पत्रावर सरपंच या नात्याने ईलोसे क्र १ यांनी सही करून पाठवण्यासाठी इलोसे क्र १ व २ यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 50,000/- रु ची लाचेची मागणी करून तडजोडी अंती 30,000/- रु ची लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून ती पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ *सापळा अधिकारी* – अनिल बडगुजर,
पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक. मो. नं. 8999962057

▶️ *सापळा पथक*
1) पो.ना. दिपक पवार.
2) पो.शि. संजय ठाकरे
▶️ *मार्गदर्शक-*
1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 9371957391
2) मा.श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक, ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक.
मो नं 9404333049
▶️ *सहकार्य* – श्री.नरेंद्र पवार. वाचक, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 9822627288
———————
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
*अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक
*@ टोल फ्रि क्रं. 1064
==============


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.