loader image

बघा व्हिडिओ-साईराज परदेशी ने पटकावले एक सुवर्ण एक रौप्यपदक

Jan 3, 2024


ईटानगर अरुणाचल प्रदेश येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज राजेश परदेशी याने १३३ किलो स्नॅच १६१ किलो क्लीन जर्क असे २९४ किलो वजन उचलून सलग दुसऱ्या राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक व ज्युनियर मध्ये रौप्यपदक पटकावले
साईराज छत्रे विद्यालयात ई ११ वी ला शिकत असून भारतीय क्रीडा प्राधिकरण औरंगाबाद येथे वेटलिफ्टिंग चे प्रशिक्षण घेत आहे
पूजा राजेश परदेशी हिने सिनियर्स मध्ये ६४ किलो वजनी गटात चांगली कामगिरी केली
यशस्वी खेळाडूना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका संगीता पोतदार जय भवानी व्यायाम शाळेचे मोहन अण्णा गायकवाड डॉ विजय पाटील डॉ सुनील बागरेचा प्राचार्य डॉ दत्ता शिंपी महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या


अजून बातम्या वाचा..

.