loader image

नांदगांव येथे भाजपा महिला मोर्चा तर्फे सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी

Jan 3, 2024


 

नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगांव शहरातील महात्मा ज्योतिबा फुले चौक येथे माता सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीस महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास आणि तदनंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना पुष्पहार व पुष्प अर्पण करुन करण्यात आला.
सदर कार्यक्रमात बोलताना भाजपा च्या माजी प्रदेश उपाध्यक्षा ॲड जयश्रताई दौंड म्हणाल्या समस्त स्त्री वर्गास शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या माता सावित्रीबाई यांनी मुलींच्या, महिलांच्या शिक्षणाचे महत्त्व जाणुन कित्येक स्त्रियांना प्रेरीत केले, त्यांनी महीलांसाठी पुण्यात भारतातील पहिली शाळा सुरु केली आणि त्या भारताच्या प्रथम शिक्षिका झाल्या, त्यांचीच प्रेरणा घेऊन पुढे फातिमा शेख यांनी देखील शिक्षिका प्रशिक्षण घेऊन आणि पदवी प्राप्त करून भारताच्या पहिल्या मुस्लीम महीला शिक्षिका झाल्या.
तसेच भाजपा शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर म्हणाले लवकरच पुण्यात माता सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केलेल्या जागेवर महायुती सरकार तर्फे एक भव्य सुशोभित असे स्मारक होणार आहे आणि त्या निमित्ताने आज च्या युगातील मुलींना व महिलांना, माता सावित्रीबाई यांचा लढा व त्यातुन प्रेरणा मिळणार आहे. आणि हीच माता सावित्रीबाई फुले यांना खरी श्रद्धांजली असणार आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन भाजपा महीला मोर्चा तर्फे करण्यात आले. कार्यक्रमा वेळी जयश्रीताई दौंड, राजाभाऊ बनकर, दिपक पाटील, सतिष शिंदे, मनोज शर्मा, गणेश शर्मा, अन्नपूर्णा जोशी, तारा शर्मा, धम्मवेदी बनकर, अमोल चव्हाण, काजल जाधव, परवीन शेख, सरला गोखने, कविता माले, उज्वला लोखंडे, संगीता बागुल, जिजाबाई परदेशी, लता अडकमोल, रेखा सोनवणे, सुमन जाधव, गरुड ताई, जाधव ताई, उषा सोरे आदी महीला उपस्थित होत्या.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.