loader image

क्रांतिज्योती फुलेंची प्रतिकृती फुलांवर!कल्पना अन् कलेचा सुंदर आविष्कार देव हिरेंकडून सादर.

Jan 3, 2024



काट्यांमधून मार्ग काढत गुलाबाचा सुगंध जसा परिसर दरवळून टाकतो अगदी तसाच काट्यांचा संघर्ष करत फुले दांपत्याने स्री शिक्षणासाठी आयुष्य वेचले. यास क्रांतीच्या फुलाने आज अनेक महिलांचे आयुष्य यशाच्या सुगंधाने दरवळून निघाले आहे. प्रत्येक महिलेच फुलांसोबत जिव्हाळ्याचं नातं असतं. फुले स्वागताची असो, लग्नाची असो, जीवनात यशस्वी होण्याची असोत ती पदरात पडण्याचं भाग्य मिळालं ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच. याच भावनेतून गुलाबाच्या फुलावर रंगीत पेनांच्या सहाय्याने सावित्रीबाईंची प्रतिकृती साकारण्याची कल्पना सुचली व अवघ्या वीस मिनिटात ती पूर्णत्वास नेली. या अनोख्या कलेतून ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन !

  • देव हिरे
    कलाशिक्षक ( शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड.जि.नाशिक.)


अजून बातम्या वाचा..

.