loader image

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण संपन्न

Jan 5, 2024


मनमाड-येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राघो कांबळे व सौ. विद्या कांबळे तसेच श्री. कर्णा गरुड व सौ. सिंधू गरुड, अध्यक्ष म्हणून माननीय मुख्याध्यापक फादर मॅल्कम तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्स्ना, माननीय फादर लॉईड, प्राथमिक शाळेच्या मा. मुख्याध्यापिका अर्चना निकाळे मॅडम, सिस्टर रोझ, श्री. मुकुंद झाल्टे सौ. शुभदा वाघमारे व सौ. पुष्प लता मोरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हेमंत वाले व सौ.जयश्री पारखे मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.अनिल निकाळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख सौ. अंजेलीना झेवियर मॅडम यांनी करून दिली. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार माननीय मुख्याध्यापक फादर मॅल्कम व पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्स्ना यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा चषके देऊन सत्कार करण्यात आला.या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.दत्तू जाधव यांनी केले.याप्रसंगी मान्यवर प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून शाळेचे कौतुक केले तर माननीय मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणातून शाळेचा शैक्षणिक भौतिक प्रगतीचा अहवाल थोडक्यात सांगितला. आभार प्रदर्शन श्री अशोक गायकवाड सर यांनी केले. शाळेच्या गायक वृंदाने सुरुवातीलाच इशस्तवन सादर करून उपस्थितांची वाह वाह मिळवली.त्यानंतर झालेल्या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी वर्गनिहाय विविध लोकनृत्य सादर करून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले व उपस्थितांची मने जिंकली.


अजून बातम्या वाचा..

.