उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ, उमराणे संचलित मा. तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमराणे येथे दिनांक ०३-०१-२०२४ रोजी प्रभारी प्राचार्य डॉ. कैलास के.खैरनार यांच्या हस्ते क्रांतिज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्यहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख व्याख्याते प्रा. कु. गवळी ए. एस. यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याची ओळख करून दिली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. खैरनार कैलास के. यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्यामुळेच आज महिला वर्ग सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्य करीत आहेत. त्यांनी तत्कालीन समाजातील अंधकार घालविण्यासाठी सामाजिक कार्याचा वसा घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. मवांळ एस. बी. यांनी केले. आभार प्रा. गावित एम. एम. यांनी मानले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, कार्यालयीन प्रशासकीय सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राशी भविष्य : ०८ ऑक्टोबर २०२५ – बुधवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...