loader image

डिजिटल युगात पत्रकारांनी मागे राहता कामा नये – ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम

Jan 6, 2024


लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून पत्रकारितेची जबाबदारी अत्यंत महत्वाची असून पत्रकारितेत होणाऱ्या बदलाचे आव्हान स्वीकारून पत्रकारांनी देखील हा बदल स्वीकारला पाहिजे. सध्या डिजिटल युग असल्याने त्यात मागे राहता कामा नये म्हणून युगाची पावले ओळखून स्वतःला तयार केले पाहिजे. जो आव्हानांचा स्वीकार करेल जो गुणात्मकता जोपासेल तोच भविष्यात टिकणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांनी येथे केले.

६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार परिषद, मुंबई संलग्नित नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने नांदगाव येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार भास्कर कदम होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे, जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, अशोक परदेशी, मारुती जगधने, प्रा. सुरेश नारायणे, जगनराव पाटील, नरहरी उंबरे, सोमनाथ घोंगाणे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे यांनी प्रास्ताविकात पत्रकार संघाचा आढावा घेऊन मराठी पत्रकारीतेतील बदलांचा मागोवा घेत वेगळेपण जपणाऱ्या व स्पर्धेच्या युगात गुणात्मक दृष्ट्या आघाडीवर असलेला पत्रकारच टिकू शकतो असे सांगत मार्गदर्शन केले. तसेच २८ जानेवारी रोजी होणाऱ्या पत्रकार दिनाचे नियोजन विशद केले. जेष्ठ पत्रकार अशोक परदेशी यांनी आचार्य जांभेकर यांची दर्पण पत्रकारिता डोळ्यासमोर ठेवून तशी आदर्शवत पत्रकारिता आजच्या पत्रकारांनी करावी. विविध उदाहरणे देत सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडणे गरजेचे असल्याचे आवाहन केले. जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी यांनी पत्रकारितेत दरवर्षी बदल होत असतात. पत्रकारितेतील सद्य परिस्थिती व मागील परिस्थिती हा बदल विशद केला. पत्रकार म्हणून काम करतांना पत्रकारांना येणारे अनुभव व समस्या विशद केल्या. जेष्ठ पत्रकार जगनराव पाटील यांनी स्पर्धेचे युग असल्याने आपणही त्या बरोबर चालले पाहिजे असे आवाहन केले. जेष्ठ पत्रकार प्रा. सुरेश नारायणे यांनी पत्रकार हा समाज प्रबोधन करत असतो. ज्यावेळी पत्रकारावर अन्याय होतो त्यावेळी समाजाने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी अनेक मान्यवरांचा आणि पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. कोषाध्यक्ष निलेश वाघ यांनी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाचा मागील वर्षाचा जमा खर्चाचा आढावा सादर केला त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन जेष्ठ पत्रकार मारुती जगधने यांनी तर सूत्रसंचालन संघटक प्रमित आहेर, आभार सरचिटणीस संदीप जेजूरकर यांनी केले. यावेळी अशोक बिदरी, बाबासाहेब बोरसे, ज्ञानेश्वर दुकळे, संजय मोरे, अनिल आव्हाड, राजेंद्र जाधव, रामदास सोनवणे, सोमनाथ तळेकर, गणेश केदारे, उपाली परदेशी, आनंद बोथरा, विशाल मोरे, अनिस शेख, नीलेश्र्वर पाटील, निखिल मोरे, गोरख निकम, नाना अहिरे, योगेश म्हस्के, नामदेव मवाळ यांच्यासह विविध वृत्तपत्र, वृत्तवाहिनीचे पत्रकार उपस्थित होते. यावेळी नागापूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र पवार, हिसवळचे उपसरपंच संजय आहेर यांनी पत्रकारांचा सत्कार केला.


अजून बातम्या वाचा..

.