Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची निवड चाचणी सामण्यात फलंदाजीत नाबाद खेळ

Jan 11, 2024

 

गुरुवार 11 जानेवारी 24 रोजी नाशिक क्रिकेट आसोसिएशन आयोजीत नाशिक प्रीमियर लीगच्या या पर्वांसाठी मुलींच्या संघाच्यी निवड चाचणी सामने हे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लब नाशिक येथे खेळवण्यात येत आहे. या क्रिकेट स्पर्धेत मनमाडमधील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु साक्षी शुक्ला ही खेळत आहे.
20 षटकांच्या या टि-20 सामण्यात साक्षी हि झुलन इलेव्हन या संघासाठी खेळत आहे.

उपांत्य फेरी सामण्यात साक्षीने फलंदाजी करत असताना 6 चौकाराच्या मदतीने 42 चेंडुमध्ये नाबाद 46 धावांची खेळी करुन आपल्या संघाच्या विजयात अत्यंत महत्वाची कामगीरी पार पाडली.

साक्षी ही मनमाड मधील खेळाडु असुन भुमी क्रिकेट अकॅडमीमध्ये सराव करते. मनमाडमधील या खेळाडुंची तिच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर नाशिक प्रीमियर लीग सारख्या नावाजलेल्या स्पर्धेत खेळण्याची संधी तिला मिळो अशी अपेक्षा केली जात आहे.

या प्रदर्शनासाठी मनमाडमधील या महिला खेळडुची प्रशंसा केली जात आहे. या स्पर्धेत तिने चांगले प्रदर्शन करुन नाशिक प्रीमियर लीग मध्ये हि निवड व्हावी अशी शुभेच्छा तिला देण्यात येत आहे.

भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , अंकित पगारे , तय्यबभाई शेख, हबीब शेख , शुभम बापु गायकवाड, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , भुषण शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर , कलश पाटेकर , रोहित पवार, दक्ष पाटिल, चिराग निफाडकर तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडुंना मार्गदर्शन सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे लाभले असुन श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांना पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अजून बातम्या वाचा..

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी...

read more
भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]