loader image
[ays_poll id=7]

रामतीर्थ आणि काळाराम मंदिराला भेट देणारे मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान:- डॉ.भारती पवार

Jan 13, 2024


प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी तरुणांना संबोधित करताना म्हणाले की, आज भारताच्या युवा शक्तीचा दिवस आहे. गुलामगिरीच्या काळात भारताला नवी ऊर्जा प्रदान करणाऱ्या थोर महापुरुषाला हा दिवस समर्पित आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मी नाशिकमध्ये आहे हे माझे भाग्य आहे. सर्वांना राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा.

देशाच्या तरुणाईच्या खांद्यावर भारताला एका नव्या उंचीवर नेण्याची जबाबदारी आहे. तरुणांच्या शक्तीमुळेच भारत आज जगातील पहिल्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट झाला आहे. सरकारने मागील 10 वर्षांत तरुणांना विविध संधी उपलब्ध करून दिल्या. या संधीच्या जोरांवर तरुणांनी देशाला पुढे घेऊन जावे. ते हे पूर्ण ताकदीने करतील असा मला ठाम विश्वास आहे, असे मोदी म्हणाले.

स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी जनतेला 22 जानेवारीपर्यंत देशभरातील मंदिर व तीर्थक्षेत्रांवर स्वच्छता मोहीम राबवण्याचेही आवाहन केले. जनतेने 22 जानेवारीपर्यंत देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवावी. तिथे श्रमदान करावे. आज मलाही काळाराम मंदिराला भेट देण्याची व तिथे श्रमदान करण्याची संधी मिळाली, असे ते म्हणाले.

यावेळी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नागरी अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादाजी भुसे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, सन्मानिय आमदार,खासदार,क्रीडा सचिव, अधिकारी सह मोठ्या संख्येने नागरिक व युवा उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

दोहा कतार येथे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई यूथ व जूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी...

read more
.