नांदगांव : मारुती जगधने
वैफल्यग्रस्त तरूणाने गळफास घेऊन घरातच आत्महत्या केली .असून हि घटना नांदगाव तालुक्यातील साकोरा गावाजवळील लांबबर्डी येथे घडली आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव संजय काशीनाथ घुगसे (वय ३२) असे आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
सदर तरुण नांदगाव तालुक्यातील साकोरा भागातील लांबबर्डी या वस्तीवर आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. परंतु काही दिवसांपासून पत्नी व मुले शेतात रहात होते, दरम्यान सोमवारी मयताची पत्नी शेतातून गावातील घरात पिठाचा डबा घेण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडांगळे,पोलीस हवालदार राजू मोरे ,मुदत्तर शेख, यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्याक पोलीस निरीक्षक नीतीन खंडांगळे हे करीत आहे.

मस्तानी अम्मा उर्स कमिटी 2025 नांदगाव चे अध्यक्षपदी अय्याज शेख यांची निवड
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मस्तानी अम्मा उर्स कमिटी 2025 नांदगाव चे...