loader image

तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

Jan 16, 2024


न्यायडोंगरी (प्रतिनिधी) न्यायडोंगरीच्या अगदी मध्यभागातून जाणारी मध्य रेल्वेची भुसावळ मुंबई भुसावळ या रेल्वे मार्गावरील तिसरी रेल्वे लाईन टाकण्याचे काम जोरात सुरू झाले आहे. न्यायडोंगरी गावाच्या पूर्व भागाकडे असणारा गावाचा अर्धा भाग त्याचबरोबर हिंगणे देहेरे , पिप्रीहवेली, परधडी, पिंपळगाव ,राजदेहरे ,ढेकू, जातेगाव, बोलठाण या गावांचा न्यायडोंगरीच्या पश्चिम भागाशी संबंध तुटला असून पुलाच्या कामामुळे मराठवाडा व खान्देशला जोडणारी वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. रेल्वेचे संबंधित अधिकारी व काम करणारे ठेकेदार यांनी नागरिकांना वापरण्यासाठी तात्पुरती का होईना पर्यायी व्यवस्था करून न दिल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे, त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी माजी आमदार अनिल आहेर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कुटुंब कल्याण व आदिवासी विकास मंत्री भारती पवार यांची नाशिकच्या निवासस्थानी भेट घेवून सदर समस्या मार्गी लावणे कामी आग्रह धरला असता ना.पवार यांनी त्वरित दखल घेत सबंधित अधिकारी यांची कानउघाडणी करीत पर्यायी नव्हे तर कायमस्वरुपी व्यवस्था करण्याचे आदेश दिल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.


अजून बातम्या वाचा..

.