नांदगाव : मारुती जगधने श्रीराम मंदीर देशभरात साजरा होत असताना नांदगाव तालुक्यात देखील हा उत्सव साजरा झाला तसेच वडाळी बुद्रुक ता नांदगाव येथे महिलांच्या चारशे हातांनी दोन क्विंटल गव्हाचे पुरणाचे मांडे बनवुन गाव जेवन देण्याचा आगळावेगळा उपक्रम गावाने साजरा केला या वेळी वडाळी बु येथे श्रीराम उत्सव साजरा करताना बैलगाडीवर भव्य मिरवनुक काढली तसेच यावेळी संपुर्णगावात सडा- रांगोळ्यानी गावातील रस्ते सजले होते. या सामुदायिक कार्यात सर्वांनीच हातभार लावला.
दि २२ रोजी वडाळी बु गावातील संपुर्ण रस्ते सडा रांगोळ्यांनी सजले होते निमित्त होते आयोध्येत श्रीरांम मंदीर स्थापना दिवसाचे. वडाळी बु गावातील हनुमान मंदिरात श्रीराममंदीर स्थापना उत्सव साजरा करताना संपुर्णगाव रांगोळ्यांनी सजला होता. तसेच भक्तांनी भगवीटोपी घालुन श्रीरामांच्या बैलगाडीवरील मिरवनुकीत सनई च्या ,वाद्याच्या गजरात निघालेली मिरवनुक लक्ष वेधी ठरली .
श्रीराम मंदीर स्थापनेच्या दिनी नांदगाव तालुक्यातील वडाळी बुद्रुक येथे श्रीराम रथाची भव्यमिरवनुक काढून दोन क्विंटल गव्हाचे पुरणाचे गुळ मिश्रीत गोड मांडे बनवुन गाव जेवन देण्यात आले यात सुमारे ३ हजार रामभक्तांनी गोड जेवन घेतले नांदगाव तालुक्यातील वडाळी बु येथील भव्यदिव्य धार्मीक कार्यक्राची तालुक्यात चर्चा उमटली.
या बाबत वडाळी बुद्रुक येथील श्रीराम भक्ताकडुन मिळालेल्या माहितीवरून गावाच्या सार्वजनिक नियोजनातुन सुरूवातीला
दि ७ जानेवरी २४ रोजी प्रा. राजेंद्र नंद यांच्या मार्गदर्शनाखाली
कलश मिरवनुक काढण्यात आली नंतर सार्वजनिक भोजनासाठी पुरणाच्या
मांड्याचे जेवनाचे नियोजन करण्यात आले या प्रसंगी प्रत्येक घरी श्रीराम यांचा फोटो व अक्षदा देऊन कार्यक्रमात सामील होण्याचे अमंञण देण्यात आले या अमंञणाला दाद देत नागरिकांनी हा कार्यक्रम सार्वजनिक करण्याचे ठरले .
यावेळी विविध भजनी मंडळानी यात भाग घेत ,वडाळी बु,येथे श्रीरामाची भव्य मिरवनुक वाद्याच्या गजरात काढून श्रीराम मंदीर स्थापनेचा उत्सव साजरा करण्यात आला या उत्सवात
मधुकर नंद,चंद्रभान कोरडे,राजेंद्र नंद, सीताराम सानप,बांळू नंद,देविदास नंद, गोपीचं राऊत,माधव नंद, अनिल नंद, शाम घोलप,दिलीप नंद, शांताराम साळूंेके, दत्तु थोरात,संदीप नंद
आदीच्या सहभागातुन या कार्यक्रमाची शोभा वाढत गेली या वेळी सुमारे
२०० महिलांनी सहभाग घेत राञीतुन पुरणाचे मांडे बनवुन महाप्रसादाच गावाने आनंद घेतला.या दरम्यान लोक वर्गणीतुन गहु,तांदूळ,कुरडई सह विविध धान्य जमा झाले होते यातुन
भजे,रस्सी,दुधाची बासुंदी, पुरणाचे मांडे आदी पदार्थ बनवुन गावाला महाप्रसाद देण्यात आला हा सोहळा संुर्ण दिवस भर चालु होता वडाळी बु!! येथे २२ रोजी
सकाळी श्रीराम रथ मिरवनुक, काढून ह भ प भाऊसाहेब जाधव महाराज येवला यांचे श्रीराम चरिञावर किर्तण त्या नंतर प्रथम महिलांना भोजन नंतर पुरुषांना जेवन देण्यात आले या दरम्यान वडाळी बुद्रुक गावच्या प्रत्येक घरासमोर सडा टाकून संपुर्ण गाव रांगोळ्यानी सजविला गेला तसेच मिरवनुकीचा व महा प्रसादाचा गावाने आनंद घेत श्रीराम मंदीर स्थापनेचा आनंद घेतला.

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...