Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगांव तालुका व शहर तसेच निमगाव मंडल भाजपा तर्फे महिला सबलीकरण सम्मेलनाचे भव्य आयोजन

Jan 24, 2024

नांदगांव : मारुती जगधने
येथे महिला सबलीकरण सम्मेलनाचे भव्य अयोजन भारतीय जनता पार्टी नांदगाव शहर, निमगाव मंडल आणि भाजपा नांदगांव तालुका तर्फे करण्यात आले. सदर कार्यक्रमात केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा फायदा तळा गळातील, गोर गरीब, गरजू होतकरू महिलांना कसा मिळेल आणि या कल्याणकारी योजनांचा महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास, सक्षम बनण्यास कशा प्रकारे मदत देणारे आहेत. या बद्दल महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन केंद्रिय राज्य मंत्री मा. ना.डॉ. भारतीताई पवार, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजयजी चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ तसेच संमेलनाच्या अध्यक्ष स्थानी भाजपा माजी प्रदेश उपाध्यक्षा ॲड. जयश्रीताई दौंड या होत्या त्यांच्या समवेत व्यासपिठावर जिल्हा सरचिटणीस संजय सानप, विधानसभा प्रचार प्रमुख पंकज खताळ होते तसेच व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजक तालुका अध्यक्ष गणेश शिंदे(उत्तर), मनिषा काकड(दक्षिण), शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर, शिवाजी कराडे(निमगाव मंडल), महिला मोर्चा अध्यक्षा छाया बोरसे(उत्तर), सुवर्णा आहेर(दक्षिण), मिनाक्षी हिरे(निमगाव मंडल), माजी नगरसेवक व माजी शहर अध्यक्ष राजीव धामणे, अन्नपुर्णा जोशी(म. मोर्चा शहर अध्यक्षा), तारा शर्मा(शहर उपाअध्यक्षा), अक्षदा कुलकर्णी, ॲड. मनिषा पाटील, ताराताई सोनवणे(सरपंच-सकोरा व मा. पंचायत समिती सदस्या), चंदा पाटणी(मा.ता.उपाध्यक्षा) आदी उपस्थितीत होते.
सदर कार्यक्रमात ना. भारतीताई पवार यांनी नविन तंत्रज्ञानाचा वापर महिलांना रोजगार निर्मिती साठी कसा करता येईल हे उदाहरणे देऊन समजावुन सांगितले. तसेच विजयजी चौधरी यांनी महिलांना स्वावलंबी होण्याचे मार्ग सांगितले व सरकार आपल्या कोणत्याही अडचणीत आपली मदत करेल याचे आश्वासन दिले. तद नंतर शंकरराव वाघ आणि ॲड. जयश्रीताई दौंड यांनी देखील उपस्थितीत महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला राजेंद्र पवार(वरिष्ठ प्रशिक्षक महा.बँक आर. सेटी), संजय सोमवंशी(उद्योग निरीक्षक, जिल्हा उद्योग केंद्र), रविराज बेलेकर असे व्यवहार, बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ पदाधिकारी व यशस्वी महिला उद्योजिका मनिषा इंगळे, आशा कदम, अर्चना आढाव आदी उद्योजिका यांनी महिलांना मार्गदर्शन केले आणि उद्योगासाठी प्रेरीत केले. उपस्थित महिलांना हळदी-कुंकू लाऊन आणि तीळ गुळ वाटुन त्यांना ना.पवार यांच्या हस्ते वान देण्यात आले व भाजपा महिला पदाधिकारी यांच्या कडून ना. पवार यांना हळदी कुंकू आणि तीळ गुळ वाटुन वान देण्यात आले.
मा.ना.डॉ. पवार यांनी महिलांना मार्गदर्शन केल्या नंतर स्वतः हाताने कमळाचे चित्र काढून भाजपा च्या दिवार लेखनाचा कार्यक्रम व हनुमान टेकडी येथील संत जनार्दन महाराज मंदीर येथे स्वच्छ्ता करीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलेल्या मंदीर स्वच्छतेचा कार्यक्रमही राबविला. सदर मंदिर स्वच्छतेच्या कार्यक्रमात ना. पवार, विजयजी चौधरी यांच्या समवेत शंकरराव वाघ, ॲड. जयश्रीताई दौंड, संजय सानप, पंकज खताळ, गणेश शिंदे, मनिषा काकड, राजाभाऊ बनकर, राजीव धामणे, सोमनाथ घोंगाणे आदी कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली.
सदर कार्यक्रमास सतिष शिंदे, मनोज शर्मा, भगवान सोनवणे, संदिप पगार, प्रशांत इनामदार, भगवान व्हाडगर, फिरोज खाटीक, बबन मोरे, सतिष आहीरे, अण्णा काळे, दिनेश दिंडे, धम्मवेदी बनकर, दत्तु शेलार, अरुण पवार, हिरा सानप, डॉ. कारभारी आहेर, प्रविण पवार, वंश पटाईत आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकारांनी हातात झाडू घेऊन उद्यानाची संपूर्ण स्वच्छता केली....

read more
नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर...

read more
मनमाड ता. २७  : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.

[contact-form][contact-field label="Name" type="name" required="true" /][contact-field...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

स्वराज्य चे संस्थापक महापराक्रमी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जयंती निमित्ताने...

read more
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे भव्य...

read more
मनमाड –स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने  अंधेरी येथील होली फॅमिली हायस्कूलमध्ये विज्ञान व गणित तसेच इतर विषयाशी संबंधित शैक्षणिक विषयांवर आधारित आंतर शालेय स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करून घवघवीत यश मिळवले‌

मनमाड --स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने अंधेरी येथील होली फॅमिली...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]