नांदगाव. : मारुती जगधने नांदगाव येवला रोडवर आवजड वाहनांची वर्दळ अधिक आहे .त्यामुळे लहानमोठे अपघाला वाह नधारकाना सामोरे जावे लागत असतानाच येवला रोडवर तांदळवाडी शिवारात बोलेरो गाडी अचानक झाडावर आदळल्याने चालक हे गंभीर जखमी झाले त्यात ते ठार झाले.
नांदगाव येवला रोडवर तांदूळवाडी शिवारात दि २४ जानेवारी रोजी नांदगावच्या दिशेने येवल्या कडे जाणाऱ्या बोलोरो जीप MH 14 DA 0939 या वाहन चालकास अचानक नियंञण सुटल्याने बोलोरो गाडी रस्त्याच्या बाजूला उभ्या झाडावर जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून वाहन चालक प्रकाश लक्ष्मण दाभाडे रा. बोकटे ता येवला हे गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले रुग्णालयात नेताना च त्यांचा रस्त्यात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

