loader image

परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपयोगी व प्रेरणादायी :- डॉ भारती पवार

Jan 29, 2024




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या उपक्रमाच्या सातव्या सत्रामध्ये आज देशभरातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधून येणाऱ्या परीक्षांच्या दिवसांसाठी प्रोत्साहित केले नाशिक शहरातील भोसला मिलिटरी स्कूल येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रक्षेपित केलेल्या या कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार या उपस्थित होत्या पंतप्रधानांच्या मार्गदर्शनानंतर भोसला विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची संवाद साधताना डॉ भारती पवार म्हणाल्या की कोणत्याही परीक्षेत यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत आवश्यक असते आयुष्यात पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना आत्तापासूनच ध्येय निश्चिती करावी लागेल आणि तसे करताना शालेय जीवनातील शिस्त आणि चांगल्या सवयी महत्त्वपूर्ण ठरतील कोणतीही प्रलोभने पुढे आली तरी विद्यार्थ्यांनी शिस्त मोडू नये कारण या शिस्तीच्या मुळेच जीवनामध्ये पुढे जाऊन यश मिळवता येते मिळवता येते आत्मनिर्भर भारताचे भविष्य म्हणून पंतप्रधान विद्यार्थ्यांच्या कडे पाहतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी न घाबरता पुढे जायचे आहे आणि वेळेच्या सदुपयोग करायचा आहे आपल्या देशासाठी आपला काही उपयोग झाला पाहिजे ही भावना खूप मोठी आहे.
यावेळी दिपक खैरनार, मनिषा बोडके, हेमंत रावले, यतीन पवार, काशिनाथ गुंजाळ, बाळासाहेब चौधरी,जगन धूम,अविनाश भिडे, हेमंत देशपांडे, मिलिंद वैद्य, आनंद देशपांडे, राजेंद्र जगताप सह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.