loader image

नांदगाव येथे महाविकास आघाडीचे आंदोलन

Feb 2, 2024


महाविकास आघाडीचे आंदोलन
नांदगाव : मारुती जगधने नांदगाव तालुका महाविकास आघाडीच्या वतीने विविध मागण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले.
शासकिय तपास यंत्रणांचा गैरवापर,दुष्काळ, गारपिट व अतिवृष्टी अनुदान,कांदा निर्यातबंदी, कांदा अनुदान, हमीभाव, कंत्राटी नोकरभरती,ढासळलेली आरोग्यव्यवस्था, रखडलेली नोकरभरती, अवाजवी परीक्षाशुल्क,पेपरफुटी, अंगणवाडी, आशा, शापोआ कर्मचाऱ्यांचे प्रश्न, तालुक्यातील भीषण पाणीप्रश्न, वकील संरक्षण कायदा, दत्तक शाळा योजना, महीला सुरक्षा, मराठा,लिंगायत, मुस्लिम, धनगर समाज आरक्षण इत्यादी मागण्यावर दि १ रोजी तहसील कार्यालय नांदगाव येथे महाविकास आघाडी तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी दिली, आंदोलनात खालील बाबींवर सरकारने ठोस धोरण आखून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली.
राज्यात युवा, विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार, महिला सुरक्षा, कामगार, अंगणवाडी सेविका असे सर्वच घटक हे त्रस्त असून या सर्व घटकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कापूस, सोयाबीन, कांदा, तूर या शेतमालाला भाव नाही, अतिवृष्टीमुळे किंवा दुष्काळामुळे पिकांचे नुकसान होऊनही विम्याची नुकसानभरपाई मिळत नाही. नोकरभरतीसाठी हजार हजार रुपये शुल्क आकारूनही होत असलेली पेपरफुटी ही तर नेहमीचीच बाब झाली आहे. यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर आणि बेरोजगारांवर अन्याय होत आहे. राज्यात नवीन कोणताही प्रकल्प आणून युवांसाठी रोजगार निर्मिती केली जात नाहीच पण महाराष्ट्राच्या वाट्याचे हक्काचे प्रकल्प इतर राज्यांत आणि त्यातही प्रामुख्याने गुजरातमध्ये नेले जात आहेत. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट बनत चालला आहे. अनेक दिवस कडाक्याच्या थंडीत आंदोलन करुनही अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या आंदोलनाकडं सरकार ढुंकूनही बघत नाही. दरवर्षी लाखो युवा शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत, पण त्यांच्या हाताला काम मिळत नाही.
युवा हा आपल्या देशाचा कणा आणि भविष्य असून एकूण लोकसंख्येमध्ये त्याचं प्रमाण ६० टक्के आहे. तरीही त्यांच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाही. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने राज्यातील युवा वर्ग अस्वस्थ आहेत. राज्यात ३२ लाख युवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून परीक्षा फी, पेपरफुटी, रखडलेली अडीच लाख रिक्त पदांची भरती हे प्रश्नही सुटलेले नाहीत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा खर्च सरकारकडून दरवर्षी कमी-कमी केला जातोय. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या ताटात भाकर देण्याचं काम देशाचा पोशिंदा असलेला बळीराजा करतोय, पण त्याच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाही.
आमदार रोहितदादा पवार यांनी पुणे ते नागूर अशी ८०० कि.मी.हून अधिक लांबची युवा संघर्ष यात्रा काढून राज्यातील या प्रश्नांकडं सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि समूह शाळा योजनेची अंमलबजावणी करण्यापासून सरकारला माघार घ्यावी लागली. परंतु अद्यापही अनेक प्रश्न शिल्लक आहेत पण सरकार हे प्रश्न सोडवण्यासाठी काहीही हालचाल करत नाही.
असे अनेक प्रश्न आणि अडचणी लोकांना भेडसावत असूनही त्या सोडवण्याऐवजी सरकार जातीय वाद, धार्मिक संघर्ष आणि असेच इतर अनावश्यक मुद्दे पुढं आणून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचं काम करत आहे. यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामित्त्वाला तडा जातोच पण राज्याच्या प्रगतीलाही खीळ बसत आहे आणि त्यात नुकसान मात्र सामान्य माणसाचंच होत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आम्ही पुढील प्रश्नांकडं आपलं लक्ष वेधत आहोत. हे प्रश्न सर्वसामान्यांशी निगडीत असल्याने सरकारच्या माध्यमातून ते तातडीने सोडवण्यासाठी सरकारपर्यंत पोचवून सामान्य लोकांना दिलासा द्यावा.
यातील काही मागण्या या तत्काळ पूर्ण करणे शक्य असून काही मागण्यांबाबत मात्र बैठका घेऊन आणि पाठपुरावा करून पुढील काही दिवसात सोडवता येणार आहेत.
वरील मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालय नांदगांव येथे धरणे आंदोलन करण्यात आले, सदर प्रसंगी मा.आ.अनील दादा आहेर , गणेश धात्रक, संतोष बळीद, संतोष गुप्ता,अनिल जाधव, हरेश्र्वर सुर्वे, दर्शन आहेर, निलेश चव्हाण, ज्ञानेश्वर निकम, कुणाल बोरसे, मनोज चोपडे,सुरेश दांडगाव्हाल, रामदास जाधव, दिलीप चोळके, दीपक आहेर,निवृती तीनपायले, रामनाथ चोळके, मनोज निकोले, शिवराम निकम,
मच्छिन्द्र वाघ,
देविदास काळे,
नानाभाऊ काळे,
अशोक निकम,
दत्तू जाधव,
गोविंद उगले,
दिनकर पाटील,
संजय आहिरे,
मोहन बोरसे,
योगेश कोरडे,
संतोष गुप्ता,
सुनील चव्हाण,
गणपत सूर्यवंशी,
रवींद्र फोडसे,
शांतराम शिंदे,
संतोष शिंदे,
श्रावण आढाव,
सुदाम वाघ ,
शिवाजी वाघ( तालुका संघटक UBT),
बाळासाहेब वाघ,
नाना( भाऊ) पटाईत,
दिलीप वाघ,
दिनकर पाटील,
अंबादास पाटील,
दादासाहेब काळे,
प्रकाश बुचकुळे,
आणा काकाळीज,
ज्ञानेश्वर सदगीर,
मोहन निकोले,
साहेबराव गायकवाड,
सखाराम भु्सनल,
सागर भाबड इत्यादी पदाधिकारी उपस्थीत होते.
दरम्यान तालुक्यात याच स्वरुपाच्या मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब बोरकर यांनी ढोल बजाव आंदोलन छेडले होते.


अजून बातम्या वाचा..

.