Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

साकोरा पाणी योजना विजपुरवठा मंजुरी

Feb 10, 2024

नांदगाव : मारूती जगधने
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मध्यस्थीने साकोरा नवीन पाणी योजनेसाठी वीज वितरण कंपनीचे तात्काळ वीज पुरवठा देण्याचे काढले आदेश
जलजीवन योजनेअंतर्गत गिरणा धरणातून पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास गेली आहे. मात्र मागील थकबाकी मुळे वीजपुरवठा मिळत नसल्याने ग्रामस्थांवर पाणी टंचाईचे संकट कोसळल्याने त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्याकडे कैफियत मांडताच ; तात्काळ वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने साकोरा ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
तालुक्यातील साकोरा गावासाठी यापूर्वी असलेल्या एका पाणी योजनेची वीज थकबाकी प्रलंबीत आहे.गेल्या दोन वर्षांपूर्वी आ.कांदे यांनी या गावासाठी जल जीवन योजनेअंतर्गत सुमारे ४ कोटी ९२ लाख रुपये किमतीची योजना गिरणा धरणातून मंजूर करून आणली.आजमितीस ते काम पूर्ण झाले आहे.मात्र मागील थकबाकी भरल्याशिवाय नवीन योजनेस वीज पुरवठा देणार नाही,अशी भूमिका वीज वितरण कंपनीने घेतल्याने साकोरा ग्रामस्थांनां पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता.
या संतापातून ग्रामस्थ,महिला,या सर्वच घटकांनी या पाणी टंचाई विरोधात ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.तेव्हा माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे यांच्या मध्यस्थीने सदर ग्रामस्थांनी आ.सुहास कांदे यांची भेट घेऊन कैफियत मांडली. तेव्हा आ.कांदे यांनी ग्रामस्थ व वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता श्री.वाटपाडे यांची बैठक घेऊन पाणी टंचाई ची सदयस्थिती विषद केली.
आमदार सुहास कांदे यांनी सदर थकबाकी ग्रामपंचायतीने हप्ते करून भरून टाकावी.असे आवाहन केल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन तयार झाले.तेव्हा आमदारांच्या या मध्यस्थीनंतर नवीन योजनेसाठी वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा देण्याचे मान्य केले.व तसे मंजुरीचे पत्र ही दिल्याने साकोरा वासियांना मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने ग्रामस्थांनी आमदार श्री.कांदे यांचे आभार मानले आहेत.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]