मनमाड नांदगाव रोडवरील बुरुकुलवाडी परिसरात असलेल्या हनुमान मंदिरासमोर मोटरसायकल व मालट्रक च्या अपघातात नागापूर येथील तरुण ऋषिकेश पगारे वय वर्ष अठरा याचा जागीच मृत्यू झाला त्याचा सहकारी जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.अपघात होताच येथील स्थानिक रहिवासी शिवसैनिक यांनी तात्काळ स्थानिकांना सोबत घेऊन मदत कार्य सुरू केले. रुग्णवाहिका बोलवून जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले नंतर पोलिसांना कळविण्यात आले पुढील तपास पोलीस करत आहेत.
महामार्ग चौपदरीकरण झाल्यामुळे वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे संभाजीनगर, जळगाव येथील टँकर,माल ट्रक जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांची वर्दळ वाढलेली आहे म्हणून येथे गतिरोधक बसवण्यात यावा नाहीतर अशा अपघातांना नेहमी सामोरे जावे लागणार अशी मागणी शिवसेना उप शहर प्रमुख संजय दराडे यांनी केली आहे.