loader image

मनमाड शहरात कडकडीत बंद

Feb 14, 2024

मनमाड :- मराठा आरक्षणासाठी  राज्य शासनाने  काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे या प्रमुख मागणीला पाठिंबा तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सूरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मनमाड शहरात उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.  संपूर्ण शहर पहाटे पासून शंभर टक्के कडकडीत बंद आहे त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यावर शुकशुकाट पसरला असून ह्या बंद मधून मेडिकल, हॉस्पिटल यासह इतर जीवनावश्यक वस्तूंची सेवा वगळण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदगाव येथेही भास्कर झालटे व विशाल वडघुले या दोघांचे आमरण उपोषण सुरू आहे. जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका त्यांनीही घेतली असल्याने उपोषण सुरूच आहे. दरम्यान काल सायंकाळी मराठा समाजाचे सुनील पाटील, नानासाहेब शिंदे, मयूर बोरसे, परेश छोटू राऊत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मोटार सायकल रॅली काढत मनमाड करांना बंद चे आवाहन केले होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.