मनमाड :- मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे या प्रमुख मागणीला पाठिंबा तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सूरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मनमाड शहरात उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण शहर पहाटे पासून शंभर टक्के कडकडीत बंद आहे त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यावर शुकशुकाट पसरला असून ह्या बंद मधून मेडिकल, हॉस्पिटल यासह इतर जीवनावश्यक वस्तूंची सेवा वगळण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदगाव येथेही भास्कर झालटे व विशाल वडघुले या दोघांचे आमरण उपोषण सुरू आहे. जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका त्यांनीही घेतली असल्याने उपोषण सुरूच आहे. दरम्यान काल सायंकाळी मराठा समाजाचे सुनील पाटील, नानासाहेब शिंदे, मयूर बोरसे, परेश छोटू राऊत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मोटार सायकल रॅली काढत मनमाड करांना बंद चे आवाहन केले होते.

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन
मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...