loader image

येवल्यात १३ दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अटक

Feb 16, 2024


 

येवला : दुचाकी चोरणाऱ्या तीन
जणांना ताब्यात घेऊन १३ दुचाकी शहर पोलिसांनी जप्त केल्या आहे. शहर आणि परिसरातून दुचाकींची चोरी झाल्याची घटना सातत्याने घडत असतांना ही मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या दुचाकी चोरीची फिर्याद दाखल झाल्याने नविन आलेल्या जिल्हा पोलिस प्रमुखांनी दुचाकी चोरीच्या घटनांचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर येवला शहर पोलिसांच्या पथकाने

तपास सुरु केला असता रिमांड मध्ये असलेल्या पवन शंकर आहिरे (वय ३०), रा. निंबायती, मालेगाव, अंकुश दादाभाऊ गायकवाड, (वय २१), रा. नांदूर, ता. नांदगाव, हर्षल मनोहर गवारे (वय १९) म्हसरूळ,

नाशिक यांना तपासाअंती गुन्ह्यात वर्ग करून दुचाकी घेणारा साजन भिका चव्हाण (वय ३२), रा. ब्राम्हणगाव, ता. सटाणा याचे कडून ३ लाख ५३ हजार किमतीचा १३ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. येवला शहर पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक दिनेश लोखंडे, कर्मचारी चंद्रशेखर मोरे, अंकुश हेंबाडे, गणेश पवार, बाबा पवार, खैरनार यांनी ही कारवाई केली.


अजून बातम्या वाचा..

.