मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर मॅल्कम, पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्स्ना, फादर लॉईड ,दहावीचे वर्गशिक्षक हेमंत वाले सर, सौ. अंजलीना झेवियर मॅडम वर्ग मॉनिटर कुमारी श्रेया खर्डे, तेजस्वी काशीदे, कुमार गोहर दर्शन, पुष्कराज बिरारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी गौरी मोरे व कुमारी संजना पवार हिने केले तर आभार प्रदर्शन प्रकाश पटांग्रे यांनी केले. विद्यार्थ्यांपैकी कुमार आर्यन जोगदंड,कु. साक्षी टिटवे व अभिषेक सोनवणे यांनी भाषणे केलीत तर मुख्याध्यापक फादर मॅल्कम व वाले सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना उपयुक्त असे मार्गदर्शन करून परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात याप्रसंगी शाळेच्या गायन ग्रुपने अनुरूप असे गीत सादर करून वातावरण भाव विभोर केले. इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे शाळेला एक स्नेहभेट देण्यात आली.

राशी भविष्य : ०८ ऑक्टोबर २०२५ – बुधवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...