loader image
[ays_poll id=7]

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते शिव साहित्य पुस्तकं प्रदर्शन शुभारंभ                            

Feb 20, 2024

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये सालाबादप्रमाणे यंदाही संपूर्ण विश्वातील हिंदू चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नांदगाव विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुहास अण्णा कांदे, मनमाड सार्वजनिक वाचनालया चे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, जेष्ठ संचालक नरेशभाई गुजराथी, माजी अध्यक्ष प्रदीप गुजराथी, प्रज्ञेश खांदाट, सुरेश शिंदे, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती 2024 चे अध्यक्ष राजाभाऊ अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेस माल्यार्पण मान्यवरच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर छत्रपती शिवराय यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवराय यांचा पराक्रम पुस्तकं रूपाने वाचकांपर्यंत पोहचवावा म्हणून  मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित साहित्याचे पुस्तक प्रदर्शन चा शुभारंभ आमदार सुहास अण्णा कांदे यांनी फीत कापून केला. आदर्श जाणता राजा असणाऱ्या छत्रपती शिवराय यांचे जीवन वरील साहित्य हे सदैव स्फुर्ती आणि प्रेरणा देणारे आहे असे सांगत मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या या अभिनव पद्धतीने छत्रपती शिवराय यांना अभिवादन संकल्पने चे आमदार सुहास कांदे यांनी कौतुक केले मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, व संचालक नरेश गुजरथी यांनी देखील मनोगत व्यक्त केले तर सचिव कल्पेश बेदमुथा यांनी सूत्रसंचालन केले हे पुस्तकं प्रदर्शन तीन दिवस वाचकांना उपलब्ध राहणार आहे या कार्यक्रमाला शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख फरहान खान, शिवसेना तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, अल्ताफ खान, शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे रिपाई चे नेते गंगादादा त्रिभुवन,माजी नगरसेवक महेंद्र शिरसाठ, अक्षय सानप, दिपक शिंदे, सचिन मगर, मनोज जंगम, हरदीपसिंग चावला, मनोज पवार मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या ग्रंथपाल सौ संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ नंदिनी फुलभाटी, मच्छिन्द्र साळी आदी मान्यवर सह वाचक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता कार्यक्रमा चे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे व सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

जागतिक पुस्तक दिना औचित्याने स्वर्गीय श्रीमती मंगला यशवंत पटवर्धन यांचे स्मृती प्रित्यर्थ मनमाड सार्वजनिक वाचनालयास रुपये 11000/- किंमती ची ग्रंथ भेट

जागतिक पुस्तक दिना औचित्याने स्वर्गीय श्रीमती मंगला यशवंत पटवर्धन यांचे स्मृती प्रित्यर्थ मनमाड सार्वजनिक वाचनालयास रुपये 11000/- किंमती ची ग्रंथ भेट

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक शैक्षणिक, आणि साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान असणाऱ्या आणि व्रत...

read more
खंडाळ्यात २०० फूट दरीत कोसळलेल्या गोवा येथील तरुणाचे रिक्षचालकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण

खंडाळ्यात २०० फूट दरीत कोसळलेल्या गोवा येथील तरुणाचे रिक्षचालकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण

खंडाळ्याच्या मंकीहिल पॉईंट येथील दरीत 200 फूट पडलेल्या एका तरुणाला रिक्षाचालकाच्या प्रसंगावधनाने...

read more
जागतिक वसुंधरा दिन, रमजान ईद व महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे वृक्षारोपण

जागतिक वसुंधरा दिन, रमजान ईद व महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे वृक्षारोपण

जागतिक वसुंधरा दिन, रमजान ईद व महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...

read more
सामाजिक बांधिलकी जपत मनमाडच्या बेदमुथा परिवाराने ६८ रूग्णोपयोगी साहित्याची भेट देत साजरा केला अनोखा वाढदिवस

सामाजिक बांधिलकी जपत मनमाडच्या बेदमुथा परिवाराने ६८ रूग्णोपयोगी साहित्याची भेट देत साजरा केला अनोखा वाढदिवस

मनमाड शहरातील प्रतिष्ठित व्यापारी श्री नंदलालजी बिरदीचंदजी बेदमुथा यांचे 68 व्या जन्मदिनाच्या...

read more
एन आर एम यू ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ! बाप आणून द्या परतुनी ….. वेणू नायर साहेबांना आर्त विनवणी !

एन आर एम यू ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ! बाप आणून द्या परतुनी ….. वेणू नायर साहेबांना आर्त विनवणी !

मनमाड मध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आलेले एनआरएमयू चे महामंत्री कॉम.वेणू नायर साहेबांचा आजचा...

read more
दीपक शर्मा यांचे निधन

दीपक शर्मा यांचे निधन

श्री राजस्थानी बालाजी मंदिर ट्रस्ट चे सक्रिय सदस्य राजेश शर्मा, गौरव शर्मा यांचे मोठे बंधू दीपक...

read more
बघा व्हिडिओ – फलक रेखाटन – सामाजिक ऐक्य राखणाऱ्या आजच्या अक्षय तृतीया व रमजान ईद या पवित्र सणाच्या फलक रेखाटनातून हार्दिक शुभेच्छा !

बघा व्हिडिओ – फलक रेखाटन – सामाजिक ऐक्य राखणाऱ्या आजच्या अक्षय तृतीया व रमजान ईद या पवित्र सणाच्या फलक रेखाटनातून हार्दिक शुभेच्छा !

देव हिरे . ( कलाशिक्षक , शिक्षण मंडळ भगूर, संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव....

read more
.