loader image
[ays_poll id=7]

नांदगाव मालेगांव रोडवरील अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा 

Feb 25, 2024




नांदगाव : मारुती जगधने नांदगाव – मालेगांव रोड व नांदगाव – मनमाड रोड वरील बेकायदेशीर अतिक्रमणे करुन रहदारीला व फुटपाथवर केलेली अतिक्रमणे   तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच जागेवर केलेली अतिक्रमणे नोटीस मिळाल्याच्या १५ दिवसात काढावी अन्यथा या संबधीत होणाऱ्या परिणमाची जबाबदारी अतिक्रमण धारकांवर राहिल असे नोटीस व्दारे कळविण्यात आले आहे या मुळे शेकडो अतिक्रमण  व्यावसायिकां वर व कुटुंबावर बेरोजगारीचा व रोजरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे.

दि १६/२/२४ रोजी दिलेल्या नोटीस व्दारे म्हटले की 
राष्ट्रीय महामार्ग नं ७५३ चे लगत दुकान,हाॅटेल  आदी लहान मोठे  व्यवसाय करणे व बांधकाम करणे बाबत
आपणास या नोटीस व्दारे कळविण्यात येते की राष्ट्रीय महामार्ग ७५३ लगत सा क्र १०३/०००ते नं १४७,४२०,मध्ये रस्त्याच्या डाव्या ,उजव्या बाजूला आपण विना परवाना सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत राष्ट्रीय महामार्गाच्या जागेवर दुकान ,टपरी ,हाॅटेल,हाॅटेल टाकून बांधकाम करुन अनाधिकृतरित्या अतिक्रमण केलेले आहे .ते राष्ट्रीय महामार्ग नियंञण कायदा (जमिन आणी वाहतूक)२००२ व मुंबई महामार्ग अधिनियम १९५५ पथकिणारी वर्ती  समांतर रेषा नियमानुसार बेकायदेशीर कृत्य आहे.तरी आपणास नोटीसव्दारे सूचित करण्यात येते की नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसाचे आत सदरहुन घर दुकान टपरी हॉटेल त्वरीत
हटवावे अन्यथा या उपविभागामार्फत पोलीस खात्याच्या मदतीने सदर जागेवरील अतिक्रमणे कोणतीही पुर्व सुचना न देता काढण्यात  येईल व त्यावर होणारा खर्च आपणा कडुन वसूल करण्यात येईल व सदर ठिकाणी होणार्या नुकसानीस आपण जबाबदार राहणार याची नोंद घ्यावी असे नोटीसव्दारे उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग २ नासिक यांनी कळविले आहे. 
दरम्यान स्थानिक ग्रांमपंचायतीने देखील रहदारील ला व सार्वजनिक जलवाहीनीला अतिक्तमण धारकामुळे अडथळे निर्माण होत आहे .तसेच रस्ताचौफुलीवरुन रस्ता ओलांडताना वाहन चालकाला वळणावरील मार्ग दिसत नसल्याने होणारे अपघात आदी कारणास्तव झालेल्या तक्रारी आदी कारणास्तव सदर अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत .


अजून बातम्या वाचा..

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.