loader image

के आर टी शाळेत स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी साजरी

Feb 27, 2024


के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. “ने मजसी ने परत मातृभूमी ला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा” कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता पहिली इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी केलेले होते. इयत्ता पहिली स्वरा मुंगीकर. यश संसारे. इयत्ता सहावीची अंतरा कोठावदे. देवांश गंगेले. राधिका बोडके. या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी आपले मत प्रकट केले. 26 मे 1883 रोजी नाशिक जवळील भगूर या गावात झाला त्यांना लहानपणापासूनच अभ्यासाची वाचनाची ओढ होती. त्या काळात भारत ब्रिटिशांची जुलमी राजवटीखाली भरडला जात होता. सावरकर हे सर्व जवळून पाहत होते लहान वयातच देशभक्तीची ज्योत त्यांच्या हृदयात पेटली होती.मारता मारता मरेल पण इंग्रज विरुद्ध लढेन अशी प्रतिज्ञाच त्यांनी लहानपणापासून घेतली होती. त्यांचे उच्च शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. शिक्षण घेत असतानाच त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार घालून परदेशी कपड्यांची होळी केली होती. त्यांनी पुण्यात अभिनव भारत नावाची क्रांतिकारी संस्था स्थापन केली. पुढे बॅरिस्टर होण्यासाठी ते परदेशात गेले. तेथे त्यांनी फ्री इंडिया सोसायटी नावाची संघटना स्थापन केली. त्यानंतर लंडनमध्ये त्यांना अटक झाली. कैद होणे हे सावरकरांना आवडले नाही. त्यांनी इंग्रजांच्या तावडीतून सुटण्यासाठी भर समुद्रात उडी मारली पोहत पोहत ते माँर्सेलीस बंदरावर पोहोचले पण दुर्दैवाने त्यांना पकडण्यात इंग्रजांना यश आले ब्रिटिश सरकारने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्यांची खाजगी अंदमानच्या तुरुंगात करण्यात आली. तेथे सावरकर अक्षरशः नरक यातना भोगत होते. तुरुंगात झालेल्या छळ आणि देशासाठी अथक कष्टामुळे त्यांची प्रकृती खालावली या भारत मातेच्या महान सुपुत्रास त्रिवार अभिवादन कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर .उपप्राचार्य वैभव कुलकर्णी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना सौ. राजश्री बनकर विलास कैचे. यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गार्गी संधानाशिव. लाडली सिंग यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.