मनमाड – येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये ‘फनफेअर’ या विदयार्थीप्रिय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमाचे यजमानपद इयत्ता ८ वी ते ९ वीच्या वर्गाला देण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन हायस्कूल व ज्यु. कॉलेजचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर यांच्या हस्ते फित कापून झाले. याप्रसंगी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. वैभव कुलकर्णी, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे, श्री. धनंजय निम्भोरकर, श्री. ज्ञानेश्वर माळी आणि श्री. मनोज छाबडा हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या उपक्रमशिलतेला आणि व्यावसायिक गुणांना वाव मिळावा यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नमुद केले.
विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात खाद्यपदार्थाचे एकूण 29 स्टॉल व खेळाचे 14 स्टॉल लावले होते. मेदू वडा, चायनीज भेळ, पाणीपुरी, सँडविच, मठ्ठा, मँगो सरबत, पावभाजी, आलू भजी, दाबेली, रगडा, समोसा, ढोकळा, इडली, पेस्ट्री, दाल पकवान, वडापाव, सँडविच, कटोरी चाट, पापडी, नूडल्स, फ्रेंच फ्राईज, गिल्ली भेळ, लस्सी, चॉकलेट सँडविच, कोल्ड कोको चॅट, दहीवडा, चॉकलेट शेक, ज्यूस स्टॉल, मंचुरियन या खाद्यपदार्थासह स्पिनर गेम, पिरॅमिडस, शूटिंग बॉल गेम, शूट डबल वन, चॉकलेट इन बाऊल, टर्न बास्केटबॉल, ग्लास मार्बल गेम्स, थ्रो बॉल गन शूटर या क्रम प्रदान खेळाचा विद्यार्थ्यासह पालकांनी देखील मनसोक्त आनंद लुटला. शाळेच्या प्रांगणात भव्य अशा मंडपात विद्यार्थ्यांकडून खाद्यपदार्थांची लय लूट करण्यात आली. खाद्यपदार्थांमध्ये २९ स्टॉल व १४ स्टॉल गेमचे असे एकूण ४३ स्टॉल उभारण्यात आले होते. विविध प्रकारचे खेळ व घरगुती खाद्यपदार्थ माफक दरामध्ये विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून दिले.
असंख्य पालक व हितचिंतकांनी या कार्यक्रमास भेट दिली व समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फनफेअर कमिटीतील शिक्षकांसह शाळेच्या इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाला संस्थेचे विश्वस्त डॉ.प्रदीप साळी, श्री. तुषार चौधरी आणि श्री. ज्ञानेश्वर माळी यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्र संचालन व आभार प्रदर्शन सौ संगीता देसले कदम यांनी केले