मनमाड :- मराठा समाजाला सगे सोयरे सह आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी काल मनमाड शहरात इंदुर पुणे महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला सुमारे दीड तासापेक्षा जास्त हा रस्ता रोको करण्यात आला यावेळी आंदोलन कर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला व अर्वाच्य भाषेत त्यांचा निषेध करण्यात आला. जोपर्यंत तहसीलदार येथे येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलन कर्त्यानी घेतला यामुळे मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला मराठा समाजाला जोपर्यंत सगे सोयरे म्हणून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू असणार असल्याने आजचे आंदोलन काही काळानंतर थांबवण्यात आले फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.