loader image

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर  कॉलेजमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Feb 29, 2024


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर मुख्याध्यापक दीपक व्यवहारे.उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता पहिली व इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. इयत्ता पहिलीच्या नौमान चामडिया याने सी व्ही रमण यांची वेशभूषा करून त्यांच्या विज्ञानशास्त्र विषयी माहिती दिली. हितीशा कौराणी.झाहरा   सुवासरावाला यांनी आपले मत प्रकट केले. इयत्ता सहावीचे गार्गी संधानशिव.लाडली सिंग. सोनाक्षी राऊत.यांनी ही माहिती सांगितली भारतीय शास्त्रज्ञ ज्यांनी त्यांच्या आश्चर्यकारक शोधांनी जग बदलले. सी व्ही रमण ए.पी.जे अब्दुल कलाम. होमी.जे.भाभा श्रीनिवास रामानुजन.सत्येंद्रनाथ बोस यासारखे महान शास्त्रज्ञ होऊन गेले. महान भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रमण यांनी केलेल्या रामन प्रभावाचा शोध साजरा करण्यासाठी देशात दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिन 2024 भारतातील असे वैज्ञानिक यांना भारतच नाही तर संपूर्ण जग सलाम करते. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेत इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या विविध प्रकारच्या प्रतिकृती तयार करून शाळेत त्यांची मांडणी करण्यात आली. वर्गावर मुलांना त्या प्रतिकृती दाखविण्यात आल्या. स्टेट लाईट प्रोजेक्ट. वोल्कॅनो. एअर प्रेशर. वॉटर प्युरिफिकेशन. वॉटर डेन्सिटी. पेंडुलम. चांद्रयान -3 या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक विश्वस्त धनंजय निंभोरकर. सिद्धार्थ पगारे. विलास कैचे. प्रवीण आहेर. सौ संगीता देसले कदम यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी नीतेसाठी सौ.राजेश्री बनकर  विलास कैचे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन श्रावणी खैरनार. लावण्या पाटील. यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

.