मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ. जे.वाय इंगळे यांच्या शुभ हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास त्यांचे कार्य यावर प्रकाश टाकला सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजामधील प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देणारे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले कार्यालयीन कुलसचिव समाधान केदारे सर्व प्रशासकीय पदाधिकारी सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एन.एस.एस एन.सी.सी चे विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागाच्या विभाग प्रमुख प्राध्यापिका कविता काखंडकी यांनी केले.

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...