उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ उमराणे संचलित मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचे औचित्य साधून “निरोगी आरोग्य व विवाह पूर्व मार्गदर्शन” या विषयावर ग्रामीण रुग्णालय उमराणे येथील श्री प्रसाद जानी यांनी चर्चात्मक मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी जोडीदाराची निवड,शारीरिक तपासणी,कौटुंबिक माहिती, आवड – निवड छंद, व्यसनाधीनता, विचारधारा अशा अनेक गोष्टींचे उदाहरणे देवून विद्यार्थी – विद्यार्थिनीच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ कैलास खैरनार आपल्या मनोगतातून प्रत्येक महिला आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावत असते, मग ती आपली आई असो, बहीण असो,पत्नी असो,आजी असो प्रत्येक पुरुषामागे एक यशस्वी स्री असते.असे विचार व्यक्त केले.या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.कु.गवळी ए.के.यांनी केले. आभार प्रा. मवाळ एस.बी.यांनी मानले.कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, कार्यालयीन प्रशासकीय सेवक, व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...