चांदवड: चांदवड तालुक्यातील कुंदलगाव येथे तलाठी लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांच्या आई ,मामा तसेच मामांच्या मुली व मावशी यांनी कुंदलगाव ता. चांदवड येथील शेती वाटपा साठी निफाड दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता कोर्टात त्यांचा समझोता होऊन कोर्टाच्या आदेशानुसार कुंदलगाव ता चांदवड येथील गट नंबर 410,412,414 या गटातील 50-50 गुंठे जमीनीवर तक्रारदाराच्या आई तसेच त्यांचे मामा व इतर नातेवाईक यांच्या नावांची सातबाऱ्या ला फेरफार नोंद घेण्यासाठी व इतर महसूल रेकॉर्डवर नावे लावण्यासाठी तहसीलदार चांदवड यांचे कडे अर्ज केला होता.तो अर्ज पुढील कार्यवाही साठी मंडल अधिकारी यांचे मार्फत यातील आलोसे यांच्या कडे देण्यात आला होता.या कामासाठी यातील आरोपी विजय राजेंद्र जाधव याने तक्रारदाराकडे पंचांसमक्ष १५००० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १०,००० हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे .याच पार्शवभूमीवर ज्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन
मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...