Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

‘ मनमाड महाविद्यालयाच्या’ शिरपेचात मानाचा तुरा

Mar 21, 2024

इस्रो चा (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट नोडल पुरस्कार प्रदान
डॉ. गणेश गांगुर्डे यांचा उत्कृष्ट समन्वयक म्हणून गौरव
मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथील महविद्यालयाला भारत सरकार, अंतराळ विभाग, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), भारतीय सुदूर संवेदन संस्था ह्यांच्या वतीने देण्यात येणारा अखिल भारतीय स्थरावरील मानाचा सर्वोत्कृष्ट असा भारतीय सुदूर संवेदन संस्था आय.आय.आर.एस. सर्वोत्कृष्ट नोडल केंद्र पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
१८ मार्च रोजी डेहराडून येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. आर.पी. सिंग, संचालक, आय.आय.आर.एस., डॉ. शंतनू भाटवेडकर, वैज्ञानिक सचिव, इस्रो, भारत सरकार, डॉ. प्रकाश चव्हाण , संचालक एन.आर.एस.सी. हैद्राबाद, डॉ. प्रमोद कुमार, डीन (शैक्षणिक), आय.आय.आर.एस. डेहराडून आदींच्या उपस्थितीत डॉ. गणेश गांगुर्डे यांनी पुरस्कार स्विकारला.
मनमाड महाविद्यालयातील सर्व शाखांमध्ये विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना शिक्षण आणि संशोधनासाठी अनुकूल वातावरण आहे. महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था नेहमी संशोधनासाठी भक्कम पाठबळ देत आहे. या पुरस्काराने मनमाड महाविद्यालयच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे अशी प्रतिक्रिया महाविद्यालायचे आदरणीय प्राचार्य डॉ . सुभाष निकम सर यांनी डॉ. गणेश गांगुर्डे यांचे अभिनंदन करतांना दिली. देशभरात कार्यरत असणाऱ्या ३२१४ दूरस्थ शिक्षण कार्यक्रम केंद्रांमधून मनमाड महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे. वर्ष २०२३ साठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच अखिल भारतीय स्थरावरील मानाचा सर्वोत्कृष्ट भारतीय सुदूर संवेदन संस्था (IIRS) आउटरीच नेटवर्क समन्वयक हा पुरस्कार मनमाड महाविद्यालयातील भूगोल विभागातील सहाय्यक प्राध्यापक प्रा. डॉ. गणेश गांगुर्डे यांना देण्यात आला. हा पुरस्कार रिमोट सेन्सिंग अँड जी.आय.एस (RS & GIS) चा प्रचार समाजातील सर्व स्तरावर करून, समाज उपयोगी उपक्रमात सुदूर संवेदन व त्याचा वापर उत्कृष्टरित्या केल्या बद्दल, तसेच विद्यार्थ्यांसाठी भारतीय सुदूर संवेदन संस्थेचा (IIRS) दूरस्थ शिक्षण कार्यक्रम पोहचविण्याकरिता देण्यात आला. यासाठी संस्थेचे व महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व प्रेरणा नियमित मिळत असते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम, उपप्राचार्य डॉ.बी.एस.देसले, यांचे मार्गदर्शन व भूगोल विभागातील प्रा.डी.व्ही. सोनवणे, प्रा. प्रकाश बर्डे, प्रा. जनार्दन गावित व प्रा. विजया सोनवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे, संस्थेचे समन्वयक मा.शिक्षक आमदार डॉ. अपूर्वभाऊ हिरे, युवा नेते डॉ, अद्वय आबा हिरे पाटील, संस्थेच्या विश्वस्त तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख संपदा दिदी हिरे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.हरिष आडके, सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे विश्वस्त व पंचवटी महाविद्यालयाचे आदरणीय डॉ. बी. एस. जगदाळे, यांनी प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी यांचे विशेष कौतुक केले.

अजून बातम्या वाचा..

फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी घालता येणार नाही, पण दिवसभरही फोडता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी घालता येणार नाही, पण दिवसभरही फोडता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

आगामी दिवाळीच्या काळात फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या वापराबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने...

read more
जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर...

read more
अंडरपास दुरुस्तीसाठी बंद झाल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करावी – संतोष गुप्ता

अंडरपास दुरुस्तीसाठी बंद झाल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करावी – संतोष गुप्ता

रेल्वे प्रशासनाने कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता नांदगाव शहरातील रेल्वे अंडरपास मध्ये...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]