loader image

बघा व्हिडिओ – येवला तालुक्यातील मुखेड येथे ४५ मेंढ्या दगावल्या

Mar 22, 2024


गुरुवार 21/03/2024 रोजी येवला तालुक्यातील मुखेड येथे संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुमारे ४५ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या असून अजूनही काहींची परिस्थिती चिंताजनक  आहे.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की वंदना ज्ञानेश्वर गुमनर राहणार कानडगाव चांदवड तालुका व
हौशाबाई अंबादास भगत रा महालखेडा यांच्या या मेंढ्या चारणीसाठी मुखेड ता येवला या ठिकाणी चारणी साठी गेल्या मेंढ्यांना ताप व सर्दी असल्याने ते येवला येथील एका मेडिकल मधुन औषध घेतले  मेंढपाळ अशिक्षित असल्याने मेडीकल मधील कर्मचाऱ्याने चुकीचे  औषध दिल्याने गणेश भगत यांच्या ३५ आणि ज्ञानेश्वर गुमनर यांच्या १० मेंढ्या चुकीच्या पद्धतीने औषध दिल्यामुळे दगावल्या मुखेड येथील पोलीस पाटील मनोज दिनकर आहेर यांनीही भेट दिली व भागवत झाल्टे यांना ज्ञानेश्वर गुमनर चांदवड यांनी फोन करून सविस्तर माहिती दिली. नाशिक जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ बी आर नरवाडे  व धर्माधिकारी यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा झाली व आयुक्त यांनी येवला येथील डॉक्टरांना पाठवून त्वरित पंचनामा करण्याचे आदेश दिले संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत ४५ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या असून अजूनही  काहीचीं स्थिती चिंताजनक  आहे.  मेंढपाळनां लवकरा लवकर न्याय मिळावा अशी मागणी  वन्य प्राणी मित्र समाजीक कार्यकर्ते भागवत झाल्टे यांनी केली आहे.


अजून बातम्या वाचा..

.