मनमाड – मध्य रेल्वेच्या केंद्रीय कारखाना येथे सालाबादाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कर्मचारी श्री नंदू भागा काकड,श्री संजय पुंडलिक शिंदे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्व युनियन प्रतिनिधीद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपले मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रम प्रसंगी कारखाना परिवारातील सर्व पुरुष व महिला कर्मचारी, अधिकारी वर्ग तसेच सर्व युनियन प्रतिनिधी उपस्थित होते.



