loader image

नांदगाव बाजार समिती सचिवाचीं बोलठाण येथील व्यापारी  बांधवाना दमबाजी. प्रहार शेतकरी संघटनेचे संदिप सुर्यवंशी यांनी केला जाहीर निषेध

Apr 9, 2024




नांदगाव  सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील व्यापारी बांधवाना नांदगाव बाजार समितीचे सचिव अमोल खैरणार यांनी  कांदा लिलाव संर्दभात फोनवर धमकी दिल्याने प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख संदिप सुर्यवंशी यांच्या कडून जाहीर निषेध व विष प्राशन करूण आत्महत्या करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  याबाबत सविस्तर वृत असे की
नासिक जिल्हातील बाजार समित्या १५ दिवसापासून बंद असल्याने सोमवारी दिनांक ८ रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नासिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संबधीत घटकांची मिटींग होऊन सदर मिटींग कुठल्याही निर्णयावीणा संपूष्टात आली.
   मंगळवार दि. ९ रोजी जिल्हाभरातील विविध बाजार समितीतील व्यापारी बांधवानी तात्पुरता पर्याय म्हणून शेतकरी बांधवाना आवाहन करूण खाजगी जागेत  कांदा लिलाव  सुरू करूण कुठल्याही प्रकारची हमाली,तोलाई,वाराई कपात न करता शेतकरी बांधवाना रोख स्वरूपात पेमेंट केले. याच प्रकारे बोलठाण ता. नांदगाव येथील व्यापारी बांधवानी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख संदिप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बोलठाण येथे कांदा लिलाव सुरू केला असता नांदगाव बाजार समितीचे सचिव अमोल खैरणार यांनी बोलठाण येथील  व्यापारी श्री गौकुळशेट कोठारी यांना फोन वरूण इशारा वजा धमकी देत तुम्ही हा लिलाव बंद करा . नाहीतर मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करेल,तुमचे परवाने रद्द करेल अशी धमकी दिली . त्यावेळेस त्या ठिकाणी असलेले प्रहार शेतकरी संघटनेचे संदीप सुर्यवंशी यांनी सचिवानां फोन वर सांगितले की तुम्ही १५ दिवसापासून बाजार समित्या बंद करूण ठेवल्या आहे . आमच्या शेतकरी बांधवानी कांदे कुठे विकायचे . तुम्ही जर व्यापारी बांधवा वर कायदेशीर कारवाई केली व आमच्या कांदा लिलावास विरोध केला तर मी व माझ्या सह येथील सर्व शेतकरी विषप्राशन करूण घेवू व यास  बाजार समिती सभापती, सचीव हे जबाबदार राहतील व या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो.


अजून बातम्या वाचा..

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.