loader image

ऐतिहासिक भारतीय रेल्वेचा आज 171 वा ( स्थापना दिन वर्धापन दिन )

Apr 16, 2024


 

भारतीय रेल्वे च्या आजपर्यंत च्या ऐतिहासिक प्रवास मध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या सर्व आजी माजी कर्मचाऱ्यांना ,अधिकाऱ्यांना भारतीय रेल्वे च्या 171 व्या वर्धापन दिना च्या अगणित हार्दीक शुभेच्छा
बरोबर १६ एप्रिल १८५३ म्हणजेच आजच्याच दिवशी धावली होती ठाणे-बोरीबंदरदरम्यान पहिली रेल्वे. आणि पुढील काळात याच रेल्वेची चाके धावली १८५४ मध्ये कल्याण पर्यत,१८६० मध्ये भुसावळ पर्यत,१८६७ मध्ये नागपुर पर्यंत पुढे मनमाडमार्गे थेट जम्मूपर्यंत त्यामुळे रेल्वे बरोबर मनमाडचे नाव जोडले गेले ते कायमचेच, मनमाड रेल्वे स्थानक चे उदघाटन “सन १८६६ “साली झाले, तर रेल्वे विकासा च्या टप्प्यात सन १९६८-१९६९ साली मनमाड रेल्वे स्थानकाचे विद्युतीकरण झाले आणि लोखंडाला गंज लागू नये म्हणून मनमाडच वातावरण पोषक त्यामुळे मनमाड येथे सन १९०५ साली मध्य रेल्वेचा कारखाना सुरु झाला १९२८ साली या कारखान्या चें विस्तारिकरण करण्यात आले कोकण रेल्वेच्या निर्मिती मध्ये अनेक अवघड पूल निर्माण कार्य या मनमाड रेल्वे कारखान्याने केले या कारखान्यात सध्या १४०० पेक्षा जास्त कामगार कार्यरत आहेत तर देशाच्या विविध भागात जाण्यासाठी येथे रेल्वेचे मोठे जाळे विणले गेले त्यात मनमाड रेल्वे स्थानक जंक्शन झाले मनमाडला रेल्वे आली आणि मनमाडच नाव रेल्वेच्या चाकांबरोबर सर्वदूर गेले हजारो हातांना काम मिळाले आजही मनमाड शहरची अर्थ व्यवस्था ८०% रेल्वे वरच अवलंबून आहे तर रेल्वे ची नाळ ही मनमाड च्या सामाजिक,शैक्षणिक ,क्रीडा, औद्योधीक ,व्यापारी,धार्मिक क्षेत्रातील विविध बाबी शी कायमस्वरूपी जोडली गेलेली आहें उत्तर महाराष्ट्र चे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड हुन भारतात चारही दिशाना जाणे साठी प्रवासी रेल्वे गाड्याआहेत दररोज २५००० पेक्षा जास्त रेल्वे प्रवासी मनमाड रेल्वे स्थानका तुन येजा करतात तर ०९ प्रवासी रेल्वे गाड्या मनमाडहुन सुटुन मनमाड ला टर्मिनेट होतात ( यात सन १९७५ साली सुरु झालेली मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस ,गोदावरी एक्सप्रेस अजंता एक्सप्रेस, मनमाड धर्माबाद एक्सप्रेस,या विशेष गाड्या आहेत ) तर कोट्यवधी रूपयाचे उत्पन्न रेल्वे ला मनमाड स्टेशन दररोज देत आहे सुमारे १५० प्रवासी व २०० पेक्षा जास्त मालवाहतूक रेल्वे गाड्या मनमाड रेल्वे स्थानका तुन दररोज धावतात मनमाड रेल्वे स्थानका तून काही कोटी चा व्यवहार माल रेल्वे वाहतुकीच्या दळण वळण माध्यमा तुन दररोज देशात पाठवला जात आहे मनमाड व परिसरातील ग्रामीण भागातील सुमारे ०५ हजार पेक्षा जास्त चाकरमाने या रेल्वे द्वारे रोज उपडाउन करतात रेल्वे ब्रिज कारखाना व इतर विभाग मिळून काही हजार कामगार येथे काम करतात सध्या मनमाड रेल्वे स्थानका चे आधुनिकीकरण करण्याचे कार्य रेल्वे प्रशासन द्वारा युद्ध पातळी वर सुरु असून रेल्वे स्थानका मध्ये प्रवासी सोयी साठी एक नवीन पादचारी पुल निर्माण करण्यात आला , दोन सरकते जिने सुरु करण्यात आले,तीन लिफ्ट बसवन्यात आली चार भव्य नवीन वाहनतळ उभारले गेले आहे प्रवासी सुरक्षे साठी रेल्वे स्थानका ला संरक्षण भिंत उभारली गेली आहे तसेच संपूर्ण रेल्वे स्थानका त सी सी टीवी कैमरे बसवले आहेत आगामी काळात मनमाड रेल्वे स्थानकात नवीन पार्सल कार्यालय , भव्य प्रवेशद्वार, भव्य सर्व सामान्य प्रवासी प्रतीक्षालय, आधुनिक व्यापार संकुल, भव्य विश्रांति गृह रेल्वे प्रवाशांन साठी आधुनिक सिनेमागृह रेल्वे सुरक्षा बल ( आर पी एफ ) रेल्वे पोलीस (जीआरपी) यांची सुसज्ज आणि आधुनिक कार्यालय सर्वात मोठे वाहनतळ प्रत्येक रेल्वे फलाट वर प्रवासी आरोग्य सेवा केंद्र आवश्यकते नुसार नवीन फलाट निर्मिती आदी प्रमुख निर्माण प्रस्तावित आहेत लवकरच मनमाड इंदौर या रेल्वे महा मार्ग चे कार्य सुरू होणार आहे त्यामुळे मनमाड़ ची अर्थव्यवस्था शक्तिशाली होईल मनमाड स्थानक लवकरच मध्य रेल्वे चे सर्वात मोठे टर्मिनस होओ हीच या शुभ दिनी सदिच्छा ! कारण रेल्वे म्हटली की मनमाड, आणि मनमाड म्हटलं की रेल्वे हे नातं अगदी घट्ट झालं आहे अगदी मायलेकरावाणी भारतीय रेल्वे ला आणि सर्व रेल्वे अधिकारी ,कर्मचारी बंधु भागिनिना, सर्व रेल्वे प्रवासी वर्गाला या रेल्वे च्या 171 व्या वर्धापन (स्थापना) दिन च्या मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा नितिन पांडे ❗भारतीय रेल्वे – दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद क्षेत्रीय समिति सदस्य ❗भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष ,मनमाड❗


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.