मनमाड – सालाबादप्रमाणे यंदाही 1986 पासून सलग 38 व्या वर्षी ओम मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सवसमिती तर्फे बुधवार दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी चैत्र शुद्ध नवमी श्रीराम नवमी निमित्ताने मनमाड शहरातील श्रीराम मंदिर, आठवडे बाजार येथे खालील भरगच्च घर्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यात सकाळी ठीक 07 वाजता महाभिषेक पूजा, दुपारी ठीक 12 वाजता श्रीराम जन्म भजन जन्मोत्सव आणि महाआरती सायंकाळी ठीक 05-30 वाजता पारंपरिक पद्धतीने भव्य श्रीराम रथ यात्रा मिरवणूक रात्री ठीक 09-00 वाजता महाआरती या सर्व कार्यक्रमाना सर्व श्रीराम बंधू भगिनींनी मोठया संख्येने या धार्मिक कार्यक्रम व रथ यात्रा मिरवणुकीत सहभागी व्हावे असे नम्र आवाहन ओम मित्र मंडळ संचलीत श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड तर्फे करण्यात आले आहे.

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...