loader image
[ays_poll id=7]

रामनवमी निमित्त आमदार कांदे यांच्या हस्ते आरती

Apr 18, 2024

नांदगाव – शहरातील श्रीराम मंदिरात आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते अयोध्यापती प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य आरती मोठ्या भक्तीभावात संपन्न झाली.
सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातील श्रीराम मंदिरात अयोध्यापती श्रीराम नवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.तर आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते भव्य आरतीचे आयोजन करण्यात
आले.आरतीनंतर आमदार श्री.कांदे यांनी प्रभू रामचंद्रांचे मनोभावे दर्शन घेतले.
आमदार सुहास कांदे यांचा यावेळी श्रीराम उत्सव समितीकडून सत्कार करण्यात आला.
अयोध्येत राममंदिराचे निर्माण केल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी असल्याने शहरासह,ग्रामीण भागात घराघरावर भगव्या ध्वजाच्या गुढ्या उभारण्यात आल्या होत्या.सर्वत्र भगवे वातावरण निर्माण झाल्याने रोमांचक वातावरणात श्रीराम नवमी साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमोद भाबड, सागर हिरे, प्रकाश शिंदे, सुनील जाधव,
शशी सोनावणे, भावराव बागुल, महेंद्र गायकवाड, दत्तराज छाजेड, विकास शर्मा, संतोष शर्मा, आदिंसह शेकडो रामभक्त उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.