मनमाड – गुरुवार 18 एप्रिल 24, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 19 ( जिल्हास्तरीय ) स्पर्धा पुणे येथे खेळवल्या जात आहे. या क्रिकेट स्पर्धेत मनमाडमधील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु नंदुरबार जिल्ह्यातर्फे खेळत आहे.
2 दिवसाच्या या कसोटी सामण्यात मनमाडमधील रुषी शर्मा व अंशुमान सरोदे यांनी सामण्यामध्ये उत्तम असे प्रदर्शन केले. साऊथ झोन विरुध्द खेळताना या सामण्यात रूषी ने दोन्हि इनिंग मध्ये मिळवुन 6 बळी प्राप्त केल्या तसेच अंशुमान सरोदे याने पहिल्या इनिंगमध्ये 38 चेंडुमध्ये 43 धावा जमवल्या ज्यामध्ये 7 चौकार व 1 षटकार त्याने लगावला. हे खेळाडु मनमाडचे असुन भुमी क्रिकेट अकॅडमीमध्ये सराव करतात.
मनमाडमधील या खेळाडुंच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर नंदुरबार संघाला विजय प्राप्त करण्यात यश आले. या प्रदर्शनासाठी मनमाडमधील या नवोदित खेळडुंची प्रशंसा केली जात आहे. या स्पर्धेत त्यांनी चांगले प्रदर्शन करुन महाराष्ट्र अंडर 19 संघात निवड व्हावी अशी शुभेच्छा त्यांना देण्यात येत आहे.
नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन चे सचिव यु. पाटील सर यांनी या खेळाडुंना या प्रदर्शनासाठी अभिनंदन केले.
भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , अंकित पगारे , तय्यब शेख, हबीब शेख , शुभम बापु गायकवाड, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , भुषण शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर , कलश पाटेकर , रोहित पवार, दक्ष पाटिल, चिराग निफाडकर तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.
या खेळाडुंना मार्गदर्शन सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे लाभले असुन श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक सुखदेव सिंग सर यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांना पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...