Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Apr 24, 2024

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती संस्थेचे आधारवड लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. राजकारण, शिक्षण व सहकार या तिन्ही क्षेत्रात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्याप्रमाणेच लोकनेत्यांनी या तिन्ही क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली. शेतकरी, आदिवासी व दलित समाजावर लोकनेते व्यंकटराव हिरे यांचे अपार प्रेम होते त्यांनी ते कृतीतून सिद्ध केले. असे विचार डॉ निकम यांनी मांडले.
या कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी एस देसले, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक विठ्ठल फंड, कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा पी व्ही अहिरे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]