loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तहसील कार्यालयात स्वच्छतागृहा अभावी होत आहे महीलावर्गाची कुचंबणा

Apr 29, 2024

नांदगाव : मारुती जगधने आम्ही समजु शकतो सध्या निवडणूक कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त आहेत पण किमान आपल्याकडे आलेल्या व्यक्ती कोण आहे याची थोडीतरी तमा तहसिलच्या काही अधिकार्यांनी बाळगावी?
तालक्याच्या घडामोडींचे केद्रबिंदु असलेल्या अद्यावत तहसिल शासकिय इमारत बांधून १० वर्षे झाली पण महिलांसाठी स्वच्छताग्रहाची व्यवस्था नसल्याने महिलांची कुचंबना होत आहे. दरम्यान दोन दिवसापूर्वी एक नामवंत महिला ज्या देशातील एका शासकिय नामांकित कंपनीच्या उच्चदर्जाच्या पदावर आहे अशा या नामांकित महिला
नांदगाव येथील तहसिल कार्यालयात खाजगी कामानिमित्त आल्या होत्या तेव्हा त्यांनी स्वच्छता ग्रहाची विचारणा केली परंतु स्वच्छता ग्रहाची व्यवस्था नसल्याचे एक महिला शिपायाकडुन सांगण्यात आले याच दरम्यान एकाच आडनाव असलेल्या अधिकार्याकडे सहीसाठी गेले असता त्यांनी मी नव्हे ते दुसरे आहे आणी ते आहे की नाही माझ्या पाठीला डोळे नाही असे उध्दट उत्तर देत त्या सभ्य व्यक्तीला अपमानित केले. नंतर एका समजदार अधिकार्याना समजताच त्यांनी पटकन सही करुन दिली.
एकंदरीत तहसिल कार्यालयातील ठराविक अधिकार्यांच्या उध्दट वर्तनामुळे संपुर्ण तहसिल विभागाचे नाव बदनाम होत असते सध्या तहसिलमध्ये पिण्याचे स्वच्छ पाण्याची
व्यवस्था नाही,महिलांना स्वच्छताग्रह नाही. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे .
दरम्यान अनेक महिला येथे कामनिमित्त येतात पण येथे महिलासाठी स्वच्छताग्रह नसल्याने महिलांची घोर कुचंबना होत असते.

अजून बातम्या वाचा..

राजे मल्हारराव होळकर यांचे शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास प्रेरणादायी – डॉ.भारती पवार

राजे मल्हारराव होळकर यांचे शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास प्रेरणादायी – डॉ.भारती पवार

चांदवड - हिंदुस्थानचे युगपुरुष श्रीमंत सुभेदार 'मल्हारराव होळकर' जन्मोत्सव सोहळा श्रीमंत महाराजा...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी.  मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य,महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षिका कर्मचारी  उपस्थित होते.उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यांची माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे व संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी....

read more
मनमाड शहरात भाजपा च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी

मनमाड शहरात भाजपा च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी

मनमाड - भाजपा मनमाड शहर मंडला च्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या...

read more
.