loader image

माईलस्टोन  :  रोबोटीक सांधेरोपण शस्त्रक्रियेची शतक पूर्ती

Apr 30, 2024




डॉ स्पंदन कोशिरे यांनी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये  100 + रोबोटिक पद्धतीने गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी केल्या.

नाशिक :  अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल मध्ये “ रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी” च्या  क्षेत्रात 100 हून अधिक रोबोटिक पद्धतीने गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे  पूर्ण केल्या आहेत,  हि  महत्त्वपूर्ण कामगिरी केल्यामुळे सर्व स्तरांमधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  मोठ्या अभिमानाने आम्हाला सांगावेसे वाटते की , प्रगत वैद्यकीय उपचारांसाठी  वचनबद्ध असलेली उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य  आरोग्य सेवा देणारे रुग्णालय व  ऑर्थोपेडिक उपचारांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान , रुग्णांची उत्तम सेवा आणि  अत्याधुनिक हेल्थकेअर सोल्यूशन्स देण्याच्या आमच्या वचनबद्धतेमध्ये  उल्लेखनीय कामगिरीचा हा एक  मैलाचा दगड आहे. असे प्रतिपादन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख यांनी पत्रकार परिषेदेत पत्रकारांशी बोलताना केले.  

पुढे ते म्हणाले , रोबोटच्या साह्यानं  गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेने अचूक,  आणि कमीतकमी मानवी हस्तक्षेप करून ऑर्थोपेडिक प्रक्रियेकडे जाण्याच्या पद्धतीत नवं क्रांती घडवून आणली आहे. जागतिक दर्जाचे वैद्यकीय कौशल्य, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्ण-केंद्रित सेवा यासाठी प्रसिद्ध असलेल्या अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने या क्षेत्रात सातत्याने अभिमानास्पद  परिणाम दाखवले आहेत. शस्त्रक्रियेतील साहित्य, उपकरणे आणि तंत्रांमध्ये बर्‍याच सुधारणांमुळे या प्रक्रियेची परिणामकारकता खूप वाढली आहे. अचूक इम्प्लांट पोझिशनिंग आणि अलाइनमेंट च्या आव्हानांवर मात करण्यासाठी, नाविन्यपूर्णतेची सतत गरज भासत असते. संगणकाच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करण्याचा  नवोपक्रमाचा हा एक नवीन टप्पा सुरू झालेला  आहे.  आणि जर आपण अलीकडील ट्रेंड आणि प्रगती तंत्रज्ञानाबद्दल बोलायचे झाल्यास , रोबोटिक्सने वर्तमान आणि भविष्यासाठी नवा मार्ग दाखवला आहे. गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियांसाठी जगातील पहिला ( CUVIS) हा  स्वायत्त रोबोट आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाविन्यपूर्ण आणि कार्यक्षम सेवांद्वारे प्रगत वैद्यकीय सेवेसाठी वचनबद्ध तर आहेच  परंतु या अत्याधुनिक तंत्रज्ञानच्या साह्याने परिणामकारक उपचार आता रुग्णांवर  होत आहेत.

या प्रसंगी  रोबोटिक ऑर्थोपेडिक सर्जन  डॉ स्पंदन कोशिरे  म्हणाले ,   रोबोटिक गुडघा बदलण्यात सामान्यत: खालील गोष्टींचा समावेश होतो.  इन-क्लिनिक निदान,सीटी-स्कॅन शस्त्रक्रिया पूर्व नियोजन (व्हर्च्युअल सिम्युलेशन),स्वायत्त रोबोटिक सर्जिकल प्रक्रिया,हॉस्पिटलमधून लवकर  डिस्चार्ज. पारंपारिक मॅन्युअल सर्जिकल प्रक्रियेच्या तुलनेत, रोबोटिक गुडघा बदलण्याचे बरेच फायदे आहेत रोबोटिक गुडघा बदलण्याचे चांगले इम्प्लांट पोझिशनिंग, अचूक शस्त्रक्रियाने  हाड कट करणे, कमीत कमी मानवी हस्तक्षेप, जलद रिकव्हरी  आणि कमीत कमी हॉस्पिटलमध्ये राहणे असे  बरेच फायदे असल्याचे व  अत्याधुनिक रोबोटच्या साह्याने शस्त्रक्रिया हि काळाची गरज आहे असं ते  यावेळी प्रसंगी म्हणाले. 

पत्रकार व उपस्थित रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचे आभार व्यक्त करताना केंद्र प्रमुख डॉ अनुप त्रिपाठी   म्हणाले की , अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल  मध्ये असलेल्या अनुभवी, निष्णात डॉक्टरांची टीम आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि कुशल कर्मचारी यांच्या उपलब्धते मुळे आणि मेहनतीमुळे सांधे प्रत्यारोपण सारख्या शस्त्रक्रिया यशस्वी पणे पार पडतात.  तसेच प्रत्यारोपणानंतर रुग्णाची स्वच्छता आणि जेवणाची खूप काळजी घ्यावी लागते, रुग्णाला कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होणार नाही याची हि काळजी घेतली जाते . रोबोटिक सांधे प्रत्यारोपण करण्यासाठी आधी मुंबई किंवा पुण्याला जावे लागत होते परंतु आता कुठेही जाण्याची गरज नाही रुग्णाला सगळ्या सुविधा नाशिक मधेच उपलब्ध झाल्याने त्याची आर्थिक बचत होत आहे .अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स मध्ये आम्ही नेहमीच दर्जेदार उपचार आणि काळजी प्रदान करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन आरोग्य सेवा देत आहोत.
या प्रसंगी  रोबोटिक ऑर्थोपेडिक सर्जनची  टीम  डॉ जयेश सोनजे , डॉ सागर काकतकर, डॉ श्रीकांत जाधव , डॉ स्पंदन कोशिरे , आणि  रुग्णालयातील  डॉक्टर व  वैद्यकीय कर्मचारी आदी  या पत्रकार परिषेदेस  मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
.