Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

इको गाडी आणि दुचाकीचा अपघात – मनमाड च्या दोन तरुणांचा अपघाती मृत्यू

May 9, 2024

मनमाड –  मनमाड लासलगाव रोडवर रायपूर गावानजीक खंडेराव मंदिराजवळ दुचाकी व इको गाडीचा समोरासमोर धडक होऊन अपघातात  मनमाडच्या दोन तरुणांचा  मृत्यू झाल्याची दुर्दैवी दुर्घटना आज दुपारी घडली आहे. अपघात झाल्यानंतर रायपूरचे पोलीस पाटील साहेबराव नारळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले दोन्ही तरुणांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करत प्रथमोपचार करून त्यांना मालेगाव येथे अधिक उपचारासाठी नेत असताना रस्त्याचा त्यांची प्राणज्योत मालवली या घटनेची माहिती कळताच शहरावर  शोककळा पसरली आहे.
                    याबाबत अधिक वृत्त असे की मनमाड शहरातील गौतम नगर येथील रहिवासी पवन विनोद जाधव वय वर्ष 20 तर त्याचा मित्र बोरकरवाडी येथील रहिवासी योगेश पद्माकर अडांगळे वय 21 हे दोघे मोटरसायकल क्रमांक एम एच 15 बी ए 82 86 या गाडीने लासलगाव मार्गे विंचूर कडे जात असताना  रायपूर येथील खंडेराव महाराज मंदिराजवळील वळणावर समोरून येणारी इको गाडी क्रमांक एम एच 19 डी व्ही 73 94 या गाडीसोबत समोरासमोर धडक झाली या धडकेत पवन व त्याचा मित्र योगेश हे दोघे गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच रायपूर येथील पोलीस पाटील साहेबराव नारळे यांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले दोन्ही तरुणांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले यावेळी त्यांच्यावर प्रथम उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी मालेगाव येथे नेण्यात आले मात्र मालेगाव कडे जात असताना अर्ध्या रस्त्यातच दोघांची प्राणज्योत मालवली या घटनेची माहिती मिळतात मनमाड शहरावर शोक कळा पसरली आहे या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]