नांदगाव : मारुती जगधने आना तो था ही … लेकिन आते …आते… देर कर दी…असे स्लोगन स्मशान भुमीच्या भिंतीवर लिहिलेले असतात पण नांदगाव
च्या स्मशानभूमित लाईट नाही, पुरेशी आसन व्यवस्था नाही,पाण्याची सोय नाही, सुविधांचा अभाव नांदगाव च्या स्मशानभूमित दिसून आला. नांदगाव च्या स्मशानभूमीत अंत्यविधीला आलेले सगे सोयरे व नातेवाईक स्मशानात अंधार असल्याने चाचपडत मोबाईलच्या बॅटरीचा वापर करुन अंत्यविधीला उपस्थित झाले त्यामुळे मयताच्या नातेवाईकाना एका ज्येष्ठ महिलेचा अंत्यविधी स्मशानात अंधारात करण्याची वेळ आली. आलेली पाहुने मंडळी माञ नांदगाव च्या स्मशानभुमीची आठवण घेऊन परतली.
स्मशानभूमीत संबंधित प्रशासनाकडून स्वच्छता आणि स्वच्छता व्यवस्थापन नियमित साफसफाई आणि कचऱ्याचे व्यवस्थापन होत नाही.
स्मशान भूमीत हात धुण्यासाठी पाणी आणि सॅनिटायझरच्या सोय नाही .
– विद्युतदाहिनी (electric crematorium) ची सुविधा पण नाही ?
पारंपरिक दाहसंस्कारासाठी आवश्यक लाकडाची उपलब्धता मयताच्या नातेवाईकानी करायची
पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. स्वच्छ पाण्याचे स्रोत नाही
हॅण्डपंप आहे, नळाद्वारे पाणी पुरवठा नाही
– रात्रीच्या वेळी आवश्यक प्रकाश व्यवस्था.
– सोलर लाइट्सचा वापर शक्य असल्यास करु शकता ते दिसून येत नाही
वेटिंग एरिया आहे बसण्याची सोय ओटे बांधले आहेत. विश्रांतीगृहाची मोडतोड झालेली आहे.खास आसनांची व्यवस्था नाही .
सुरक्षा आणि निगराणी व्यवस्था नाही.
वीज पुरवठा नाही तेव्हा आणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था तर नाही.
पर्यावरणपूरक व्यवस्था जेमतेम आहे .
कचऱ्याचे पुनर्नवीनीकरण. नाही.
प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना नाही. माहिती फलक आणि डिजिटल डिस्प्ले नाही.
धार्मिक आणि सांस्कृतिक सुविधा पैकी धार्मिक विधींसाठी आवश्यक साधनसामग्री नाही.
– धार्मिक विद्वान किंवा पुजार्यांची उपलब्धता नाही
– पार्किंगची पुरेशी व्यवस्था नाही.
– स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्त्यांची देखभाल नाही रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडांनी व्यापले आहे.
आपत्कालीन परिस्थितीसाठी त्वरित मदत सेवा नाही.
याव्यतिरिक्त, स्थानिक गरजांनुसार आणि सांस्कृतिक परंपरांनुसार अतिरिक्त सुविधा पुरविणे देखील महत्त्वाचे आहे.पण तशी कोणतीच सुविधा नांदगाव स्मशानात दिसून येत नाही या संदर्भात अंत्यविधिला आलेल्या नागरिकात सुविधांचा अभाव असल्याची खंत व्यक्त होत होती.स्मशानात रोडवर लावण्यात आलेले पथदिप चोरांनी कापून नेले त्या संदर्भात पोलीसात गुन्हा नोंद नाही.स्मशानभूमित अंत्यसंस्काराला जाताना अंधारात चाचपडत जाणे आणी अंधारात चाचपडत येणे अशा वेळी ज्येष्ठाना ठोकरा खावा लगतात. अशी गंभीर समस्या नांदगाव च्या मुख्यस्मशान भुमीची झाली आहे .