loader image
[ays_poll id=7]

पदवीधर मतदार संघ द्वैवार्षिक निवडणूक,विधान परिषद शिक्षक मतदार संघ निवडणूक जाहीर

May 25, 2024


मनमाड – भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी सोमवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे.

विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ), किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे दिनांक ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

या निवडणुकीसाठी शुक्रवार, ३१ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीकरिता शुक्रवार, ७ जून, २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी सोमवार , १० जून, २०२४ रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार, १२ जून, २०२४ अशी आहे. बुधवार, २६ जून, २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. सोमवार १ जुलै, २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक ५ जुलै, २०२४ रोजी पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

जागतिक कीर्तीचे तबलावादक ,तालतज्ञ, पदमविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

दोहा कतार येथे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई यूथ व जूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी...

read more
.