महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. २७ मे रोजी दहावीचा निकाल दुपारी एक वाजता लागणार आहे.
राज्यात दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ दरम्यान झाली. या परिक्षेत यंदा १६ लाख ९ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. या परिक्षेचा निकाल आता दोन महिन्यानंतर लागणार आहे. या निकालाचे जवळपास सर्वच काम पूर्ण झाले आहे.
mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर जाऊन विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकतात. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल.